एका अल्पवयीन मुलीला खर्रा खाण्याचे व्यसन लागले. खर्रा खाण्यासाठी पैसे नसल्याने तिने पाटन टपरीवरून उधारीवर खर्रा खाण्यास सुरुवात केली. एक दिवस असा आला की तिच्याकडे पैसे नव्हते आणि पान टपरीवाला उधारीवर खर्रा देण्यास तयार नव्हता. खर्रा खाण्याचे व्यसन लागलेल्या या मुलीची अगतिकता पाहून पान टपरीचालकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. हा धक्कादायक प्रकार चंद्रपूर शहराजवळच असलेल्या दुर्गापूर येथे घडला आहे. पीडित मुलगी ही 16 वर्षांची असून पोलिसांनी तिच्यावर अत्याचार करणाऱ्या पान टपरीवाल्याला अटक केली आहे. बबन रोहणकर (52 वर्षे) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवला असून त्याच्याविरोधात पोक्सो अंतर्गतही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
हे ही वाचा : बदलापूर, पुणे, अकोला आता धाराशिव! अल्पवयीन मुलीवर पाच जणांचा अत्याचार
या मुलीला खर्रा खाण्याचे व्यसन केव्हापासून लागले याबद्दल माहिती मिळालेली नाही. मात्र खर्रा खाल्ल्याशिवाय तिला चैन पडत नव्हते. सुरूवातीला पैसे देऊन ती खर्रा विकत घेत होती. मात्र जसजसे तिचे व्यसन वाढत गेले तसतसा तिला खर्रासाठी पैसे देणे अवघड झाले. तिने पान टपरी चालकाला विनंती करून उधारीवर खर्रा घेण्यास सुरुवात केली.
हे ही वाचा : अतिशय धक्कादायक ! पोक्सोअंतर्गत अटक झालेल्या शिक्षकाची जामिनावर सुटका, पुन्हा सेवेत रुजू अन्...
ही मुलगी कधीतरी पैसे देईल असे वाटल्याने बबनने तिला खर्रा उधारीवर देण्यास सुरुवात केली. मात्र उधारी वाढतच जाऊ लागल्याने बबन भडकला होता. त्याने पीडितेला उधारीच्या पैशांबद्दल विचारण्यास सुरुवात केली. पीडिता टाळाटाळ करू लागल्याचे पाहिल्यानंतर बबनने त्याच्या मुलीच्या वयाच्या असलेल्या या पीडितेवर लैंगिक अत्याचार केला. या अत्याचारामुळे पीडिता गर्भवती राहिली आहे. मासिक पाळी चुकल्याने तिला रुग्णालयात नेण्यात आलं होतं, तेव्हा ती गर्भवती असल्याचे उघडकीस आले. धक्कादायक बाब ही आहे की या मुलीच्या घरचे पोलिसांत तक्रार देण्यासाठी फारसे इच्छुक नव्हते.
'फोनवरून सतत त्रास द्यायचा', त्रासाला कंटाळून मुलीने टोकाचे पाऊल उचलले
गोंदवले येथे एका अल्पवयीन मुलीने फोनवरून येणाऱ्या धमक्यांच्या त्रासाला कंटाळून शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एकावर दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सातारा येथे पोक्सो गुन्ह्यातील जामीनावर सुटलेला आरोपी तस्लिम मोहम्मद खान याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीच्या आईने दहिवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून या तक्रारीनुसार, तस्लिम खान हा फोनवरून आईला व घरच्यांना जीवे मारण्याची धमकी देत असल्याने मुलीने हे पाऊल उचलले आहे. यापूर्वीही तो फोनवरून वारंवार त्रास देत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तस्लिम हा याअगोदर संबंधित मुलीला त्रास देत होता. तस्लिम पॉक्सो गुन्ह्यात सातारा येथे अटकेत होता. जामिनावर सुटल्यावर तो फोन करून त्रास देत होता.
हे कुटुंब साताऱ्यात राहतात. अस्मिता (बदलेले नाव) हिच्यावर तस्लिमने अतिप्रसंग केल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्याअंतर्गत तब्बल तीन महिने तो तुरुंगात होता. तुरुंगातून सुटल्यानंतर तो अस्मिताशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत होता. ही बाब अस्मिताच्या कुटुंबीयांच्या लक्षात आल्यावर तस्लिम याला समज देण्यात आली. मात्र तरीही त्याने ऐकलं नाही. वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून अस्मिताने स्वतः ला संपवल्याचा धक्कादायक प्रकार घडला.