बदलापूर, पुणे, अकोल्या झालेल्या अत्याचाराच्या घटना ताज्या असतानाच आता धाराशिवमध्येही सर्वांना हादरवून टाकणारी घटना घडली आहे. जिल्ह्यातील भूम इथल्या एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करण्याची घटना समोर आली आहे. या मुलीवर पाच जणांना सामूहिक अत्याचार केले आहेत. या प्रकरणी पोलीसांनी चार जणांना ताब्यात घेतले असून एक जण फरार असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राज्यात महिलांवरील आत्याचार काही थांबण्याचे नाव घेत नाही. आता धाराशिवमध्येही एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना उघड झाली आहे. या मुलीवर पाच तरूणांनी अत्याचार केले. याबाबत या मुलीने पोलीसात तक्रारही दाखल केली आहे. मुलीची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे तिला तातडीने धाराशिवच्या शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर तिचा जबाब नोंदवण्यात आला. त्यात तिने आपल्यावर झालेली आपबिती सांगितली. त्यानुसार पोलीसांनी कारवाई करत चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत. तर एक जण फरार असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक गौर हसन यांनी दिली आहे.
ट्रेंडिंग बातमी - रविवारी उपनगरीय रेल्वेच्या तीनही मार्गांवर मेगाब्लॉक, कोणत्या लोकल झाल्या रद्द?
या आधी बदलापूरमध्ये दोन लहान मुलींवर अत्याचार झाल्याची घटना उघड झाली होती. त्यानंतर बदलापूरमध्ये जनप्रक्षोभ झाला होता. रेल रोको करण्यात आला. ज्या शाळेत ही घटना झाली तिथे जमावाने आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर संपूर्ण राज्यात त्याचे पडसाद उमटले होते. महाविकास आघाडीने तर महाराष्ट्र बंदची घोषणा केली होती. पण बंदला न्यायालयाने बेकायदेशीर ठरवल्यानंतर राज्यभरात निषेध मोर्चे आणि मुक मोर्चे काढण्यात आले. बदलापूरची घटना होत असतानाच पुणे, अकोला इथेही अशाच घटना समोर आल्या होत्या.
ट्रेंडिंग बातमी - लखपती दीदींसाठी मोदी आज जळगावात, एकनाथ खडसेंच्या प्रवेशाबाबत अखेर पूर्णविराम!
बदलापूर प्रकरणात सरकारने कडक कारवाईचे आश्वासन दिले. त्यानुसार कारवाईही केली गेली. सर्व आरोपींना अटक करण्यात आली. एसआयटीही नेमण्यात आली. संबधित शाळेवरही कारवाई झाली. आरोपीला लवकर शिक्षा करण्यासाठी ही तातडीने पावले उचलण्याची घोषणा झाली. राज्यात अशा घटना खपवून घेणार नाही असे मुख्यमंत्र्यांसह गृहमंत्र्यांनीही सांगितले. पण त्याचा काही एक उपयोग झालेला नाही असेच धाराशिवच्या घटनेवरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे जनतेमध्ये संताप निर्माण झाला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world