
बीड जिल्ह्यातील (Beed Crime) मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निघृणपणे हत्या करण्यात आली होती. या नंतरही बीडमधील गुन्हेगारीच्या घटनांनी महाराष्ट्र अक्षरश: हादरून गेला. दरम्यान केज तालुक्यातील गावातून आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
केज तालुक्यातील एका गावात 9 वीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करीत तिच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचं समोर आलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या मुलीचा पाठलाग केला जात होता. दोन दिवसांपूर्वी पाठलाग आरोपीने पीडितेला धमकी दिल्याचंही समोर आलं आहे.
नक्की वाचा - Juvenile Detention Centre : छत्रपती संभाजीनगरमधील बालसुधारगृहातून का गायब होत आहेत मुली? धक्कादायक कारण आलं समोर
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मुलीचा पाठलाग करीत होता. त्याने तिला धमकीही दिली. 'तू माझ्याशी बोलली नाहीस तर मी आत्महत्या करीन आणि तुझ्या आई-वडिलांनाही मारीन अशी धमकी देणाऱ्या तरुण निखिल कांबळेवर आता विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अल्पवयीन शाळकरी मुलीचा गेल्या 15 दिवसांपासून पाठलाग सुरू होता. दुचाकीवरून हा तरुण तरुणीचा पाठलाग करीत होता. ४ जुलै रोजी त्याने टोकचं गाठलं.
इतकंच नाही, तर मुलीच्या घरचे त्याला जाब विचारण्यासाठी गेले असता एका महिलेला देखील त्याने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे आरोपी निखिल कांबळेचे वडील बाळासाहेब कांबळे यांच्या विरोधात देखील दोन दिवसांपूर्वीच एका युवतीच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world