Mumbai Crime : मुंबईतून टेन्शन वाढवणारं वृत्त समोर आलं आहे. मुंबईत मुलींच्या अपहरणांचं प्रमाण दिवसागणिक वाढत असल्याचं दिसून येत आहे. गेल्या दहा महिन्यात अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे ११८७ गुन्हे मुंबईत दाखल झाले आहेत. यापैकी १११८ गुन्ह्यांची उकल झाली आहे. या घटनांमुळे मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न आ वासून उभा आहे.
ऑक्टोबर महिन्यात सर्वाधिक मुली बेपत्ता झाल्या आहेत. मुंबई पोलिसांच्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत मुंबईत महिलांसंबंधित ५८८६ गुन्हे दाखल झाले आगेत. त्यापैकी ५५६१ गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे. याशिवाय अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे ११८७ गुन्हे दाखल झाले असून यासंदर्भात तपास केला जात आहे.
मुली बेपत्ता होण्यामागील कारणं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, प्रेम प्रकरणातून पळून जाणाऱ्य़ा मुलींची संख्या सर्वाधिक आहे. अनेक ठिकाणी घरातील किरकोळ वाद, पालकांविषयीचा रागही कारणीभूत ठरत असल्याचं दिसून येत आहे. तर सेक्स रॅकेटच्या घटनांचाही खुलासा झाला. राजस्थान आणि गुजरातसाख्या ठिकाणी अल्पवयीन मुलींची लग्नासाठी तस्करी केली जाते. पोलिसांच्या कारवाईदरम्यान अनेकदा अशा घटना समोर आल्या आहेत.
कुठल्या महिन्यात किती मुली बेपत्ता
जानेवारी - १२६
फेब्रुवारी - १००
मार्च - १३१
एप्रिल - १००
मे - १२१
जून - १२२
जुलै - १०७
ऑगस्ट - १३२
सप्टेंबर १२७
ऑक्टोबर - १३६
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
