जाहिरात

Navi Mumbai Crime : सतर्क राहा, नवी मुंबई अलर्टवर? एकाच दिवसात साडे 4 कोटींची सायबर फसवणूक

नवी मुंबईत सायबर गुन्ह्यांचा वेग वाढत असल्याने पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि कोणतीही अडचण आली तर तत्काळ कळवण्याचे आवाहन केले आहे.

Navi Mumbai Crime : सतर्क राहा, नवी मुंबई अलर्टवर? एकाच दिवसात साडे 4 कोटींची सायबर फसवणूक

राहुल कांबळे, प्रतिनिधी

Navi Mumbai Cyber Crime : आर्थिक गुन्ह्यांचे सावट नवी मुंबईवर अधिकच गडद होत चाललं असून शहरभरात केवळ एका दिवसात 4.5 कोटींहून अधिक रकमेची सायबर फसवणूक झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. सानपाडा, रबाळे, उरण, तळोजा आणि उलवे या वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत वेगवेगळ्या पद्धतींनी नागरिकांना टार्गेट करण्यात आलं आहे.

  • सानपाडा : डिलिव्हरी अॅप गुंतवणूक – 2.92 कोटींचा गंडा
  • फेक डिलिव्हरी अॅपच्या गुंतवणूक योजनेत जादा परताव्याचे आमिष दाखवत तब्बल 2.92 कोटी लंपास.
  • रबाळे : गुंतवणूक फसवणूक – 1.88 कोटींची लूट
  • जादा परतावा मिळवून देण्याचे आश्वासन देत मोठ्या प्रमाणावर रक्कम घेतली आणि परतावा न देत आरोपी फरार झाले.
  • उरण : WhatsApp लिंकद्वारे 11 लाख फसवणूक
  • तळोजा : Google Play Blogच्या नावाखाली 22 लाख फसवले
  • अॅप अपडेट/ब्लॉग प्लगइनच्या नावाखाली पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडून मोठा गंडा.
  • उलवे : WhatsApp गुंतवणूक ग्रुप – 18 लाखांवर डल्ला
  • फेक स्टॉक ट्रेडिंग व VIP गुंतवणूक ग्रुपच्या नावाखाली पुन्हा एकदा नागरिकांची फसवणूक.
  • सायबर पोलिस तपासात, नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन

Mumbai Missing Girl : मुंबईतून 268 मुली कुठे झाल्या गायब? नोव्हेंबर महिन्यात सर्वाधिक बेपत्ता, भीतीदायक आकडे

नक्की वाचा - Mumbai Missing Girl : मुंबईतून 268 मुली कुठे झाल्या गायब? नोव्हेंबर महिन्यात सर्वाधिक बेपत्ता, भीतीदायक आकडे

नवी मुंबई सायबर पोलिसांनी सर्व प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे. वाढत्या सायबर फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तातडीचे आवाहन केले आहे:

  • कोणत्याही गुंतवणुकीच्या आमिषाला बळी पडू नका
  • OTP–KYC माहिती कधीच शेअर करू नका
  • आधार, PAN, बँक तपशील अनोळखी व्यक्ती/लिंक्सना देऊ नका
  • अनोळखी लिंकवर क्लिक करण्याचे टाळा
  • संशयास्पद आर्थिक व्यवहार दिसल्यास त्वरित कळवा


तक्रारी नोंदवण्यासाठी महत्त्वाचे क्रमांक

  • राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन : 1930
  • नवी मुंबई नियंत्रण कक्ष : 112 / 100
  • नवी मुंबई नेरुळ सायबर पोलीस स्टेशन – प्रत्यक्ष भेट देऊ शकता


नवी मुंबईत सायबर गुन्ह्यांचा वेग वाढत असल्याने पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि कोणतीही अडचण आली तर तत्काळ कळवण्याचे आवाहन केले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com