- मीरा रोडच्या पूनम क्लस्टर सोसायटीत कुर्बानीसाठी शेड उभारल्यामुळे हिंदू आणि मुस्लीम गटात भांडण झाले.
- वाद वाढत दोन्ही गटांमध्ये हाणामारी सुरू झाली, एका तरुणावर ब्लेड हल्ला झाल्याचा गंभीर आरोप आहे.
- मीरा-भयंदर महानगरपालिकेने तक्रारीनंतर शेड पाडल्याची कारवाई केली, त्यानंतर मुस्लीम समाजाने तक्रार दाखल केली.
बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर मीरा रोड येथील एका गृहनिर्माण सोसायटीत जोरदार राडा झाला. हिंदू आणि मुस्लीम गटात हा वाद झाला. कुर्बानीसाठी सोसायटीच्या आवारात शेड उभारण्यात आल्याने हा वाद झाला. वाद इतका वाढला दोन्ही गट एकमेकांना भिडले. हाणामारी झाली. एका तरुणावर तर ब्लेड हल्ला झाल्याचा आरोप केला जात आहे. मीरा रोडच्या पूनम क्लस्टर सोसायटीमध्ये हा प्रकार घडला आहे. सध्या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पूनम क्लस्टर सोसायटीमध्ये मुस्लिम समाजातील काही नागरिकांनी कुर्बानीच्या बकरांसाठी एक शेड उभारला होता. मात्र, सोसायटीतील हिंदू रहिवाशांनी याला तीव्र विरोध दर्शवला. रहिवाशांच्या तक्रारीनंतर स्थानिक मीरा-भयंदर महानगरपालिकेच्या पथकाने तत्परतेने कारवाई करत काल दुपारी हे शेड पाडले. या कारवाईनंतर मुस्लिम समुदायाने आक्रमक पवित्रा घेत काशिमीरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही बाजूंना शांत केले होते.
नक्की वाचा - Gold rates: सोने-चांदी झाली स्वस्त! ग्राहकांना मोठा दिलासा, पाहा आजचे ताजे भाव
दुपारी कारवाई झाल्यानंतर, रात्रीच्या सुमारास तिथे पुन्हा एकदा शेड उभारण्याचे काम सुरू करण्यात आल्याचा आरोप हिंदू संघटनांनी केला आहे. याची माहिती मिळताच हिंदू संघटनांचे कार्यकर्ते आणि स्थानिक रहिवासी तिथे जमा झाले. दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. पाहता पाहता या वादाचे रूपांतर हाथापाईत झाले. या गोंधळात दोन्ही गटांकडून एकमेकांवर हल्ले करण्यात आल्याचे समजते. या धुमश्चक्री दरम्यान मुस्लिम पक्षातील एका व्यक्तीने हिंदू पक्षाच्या तरुणावर ब्लेडने हल्ला केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
पोलीस सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी करत असून, सत्य शोधण्यासाठी सोसायटीतील 24 तास कार्यरत असणारे CCTV फुटेज तपासले जात आहेत. मुस्लिम पक्षाच्या म्हणण्यानुसार, ते कायद्याचा आणि नियमांचा पूर्ण आदर करतात. शासनाने आखून दिलेल्या नियमांच्या अधीन राहूनच कुर्बानीची विधी पूर्ण केली जाईल. दुसरीकडे, हिंदू रहिवाशांचे म्हणणे आहे की, सोसायटीचे नियम सर्व सण आणि नागरिकांसाठी समान आहेत. सोसायटीच्या आवारात जनावरे ठेवण्यास किंवा धार्मिक कारणांसाठी प्राणी बळी देण्यास त्यांचा स्पष्ट विरोध आहे. सध्या मीरा-भयंदर पोलिसांनी सोसायटीत सुरक्षा वाढवली असून परिस्थिती नियंत्रणात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world