जाहिरात

Mira Road : रस्ता ओलांडण्यासाठी सुरक्षित व्यवस्था नाही; मिरा रोडमध्ये अपघातांची मालिका, आई-मुलगी गंभीर जखमी

स्थानिक नागरिकांनीही महामार्गाच्या एका बाजूवरून दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी सुरक्षित व्यवस्था नसल्यामुळे दररोज जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडावा लागत असल्याची व्यथा व्यक्त केली.

Mira Road : रस्ता ओलांडण्यासाठी सुरक्षित व्यवस्था नाही; मिरा रोडमध्ये अपघातांची मालिका, आई-मुलगी गंभीर जखमी

इरफान सय्यद, प्रतिनिधी

Mira Road News : मिरा रोड येथील मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत मीरा गावठाण ते ठाकूर मॉलदरम्यान शनिवारी १ ऑगस्टच्या सायंकाळी सुमारे ४:४० वाजता झालेल्या भीषण अपघातात शाळेतून परतणारी एक महिला आणि तिची अल्पवयीन मुलगी गंभीर जखमी झाल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, महिला आपल्या मुलीला शाळेतून घेऊन घरी परतत असताना भरधाव वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात दोघींनाही गंभीर दुखापत झाली असून त्यांना तातडीने जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.

रस्ता ओलांडण्यासाठी सुरक्षित व्यवस्था नाही...अपघाताची मालिका सुरूच...

या घटनेबाबत माहिती देताना शिवसेना शाखाप्रमुख अजय साळवे यांनी सांगितले की, मीरा गावठाण ते ठाकूर मॉलदरम्यान रस्ता ओलांडण्यासाठी सुरक्षित व्यवस्था नसल्यामुळे अशा प्रकारचे अपघात वारंवार घडत आहेत. या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याची मागणी अनेक वेळा करण्यात आली असून संबंधित यंत्रणांकडे त्याबाबत सातत्याने पाठपुरावा करण्यात आला आहे. साळवे यांच्या म्हणण्यानुसार, या ठिकाणी यापूर्वीही अनेक गंभीर अपघात झाले असून काही नागरिकांचा मृत्यूही झाला आहे. मात्र, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि मिरा-भाईंदर महानगरपालिकेकडून अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.

नक्की वाचा - पुढील 2 महिने कसा असेल मान्सून? नवरात्रातही पावसाचा दांडिया? हवामान विभागाचा अंदाज

स्थानिक नागरिकांनीही महामार्गाच्या एका बाजूवरून दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी सुरक्षित व्यवस्था नसल्यामुळे दररोज जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडावा लागत असल्याची व्यथा व्यक्त केली. वाहतुकीचा वेग जास्त असल्याने महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि कामगार वर्गाला मोठ्या धोक्याचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com