
अविनाश पवार, पुणे: पुण्यामधून भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. पुण्यामधील चाकण शिक्रापूर रस्त्यावर भरधाव मालवाहतूक कंटेनर कडून दहा ते पंधरा गाड्यांना उडवले. या दुर्घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत असून काहींचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या चालकाला शिक्रापूर हद्दीत नागरिकांनी अडवून चांगलाच चोप दिला त्यानंतर शिक्रापूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुण्यामधील चाकण शिक्रापूर महामार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनर चालकाने 10 ते 15 जनांना चिरडल्याची घटना घडली आहे. अपघातात काहींचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून अनेक दुचाकी फोरव्हिलर कार पायी चालणाऱ्या प्रवाशांना कंटेनर चालकांने चिरडले. अपघात करून महामार्गावरून पळून जात असताना स्थानिक नागरिकांनी पाठलाग करून कंटेनर चालकाला पकडले. त्यानंतर त्याला बेदम चोप देत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
या ट्रक चालकाने सुरुवातीला चाकण शिक्रापूर रस्त्यावर दहा ते पंधरा गाड्यांना ठोकर दिली. चाकणमधील माणिक चौकात कंटेनर चालकाने तीन महिलांना उडवले, मग पळून जाण्याच्या हेतूने तो भरधाव वेगात निघाला. पोलिसांनी ही पाठलाग सुरु केला, हे पाहून त्याने इतर वाहनांना ठोकर देत राहिला. एका ठिकाणी पोलीस त्याला पकडण्यासाठी उभे होते, तेंव्हा पोलिसांच्या वाहनाला सुद्धा त्याने उडवले.
नक्की वाचा - Prithvik Pratap : नुकतंच लग्न झालेल्या पृथ्वीक प्रतापला बायकोने काढले घराबाहेर, व्हिडीओ व्हायरल
चाकण, रासे, शेलगाव, पिंपळगाव आणि चौफुला परिसरात या मालवाहतूक कंटेनर चालकाचा प्रताप सुरु होता. या अपघातात अनेक जण जखमी झालेत. घटनेनंतर संतापलेल्या नागरिकांनी ट्रक चालकाचा पाठलाग करुन पकडले. त्याला शिक्रापूर पोलिसांनी ताब्यात घेतले असून तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचे सांगण्यात येत आहे. या भयंकर अपघाताचा व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world