जाहिरात
This Article is From Jun 14, 2025

Parbhani News: आईने 3 वर्षाच्या मुलाला ओढणीने कमरेला बांधलं अन् मारली नदीत उडी

आपल्या पोटच्या 3 वर्षीय मुलाला ओढणीने कमरेला बांधून एका आईने पाण्यात उडी मारून आत्महत्या केल्याची दुःखद घटना घडली आहे.

Parbhani News: आईने 3 वर्षाच्या मुलाला ओढणीने कमरेला बांधलं अन् मारली नदीत उडी
परभणी:

दिवाकर माने

एक धक्कादायक आणि काळीज पळवटून टाकणारी घटना परभणी घडल्याचे समोर आले आहे. या घटनेत एका विवाहीतेने आपल्या पोटच्या लेकाला ओढणीने कंबरेला बांधले. त्यानंतर तिने थेट विहीरत उडी मारली. त्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. परभणीत झालेल्या या दुहेरी मृत्यूने सर्वच जण आवाक झाले आहे. पोलिसांनी ही घटनास्थळी तातडीने धाव घेत पुढील तपास ही सुरू केला आहे. काही महत्वाचे पुरावे पोलिसांना सापडले आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

आपल्या पोटच्या 3 वर्षीय मुलाला ओढणीने कमरेला बांधून एका आईने पाण्यात उडी मारून आत्महत्या केल्याची दुःखद घटना घडली आहे.  गंगाखेड तालुक्यातील खळी पाटी परिसरातल्या गोदावरी नदीपात्रामध्ये आपलं जीवन संपवलं आहे. या दुहेरी आत्महत्याने परिसरात खळबळ उडाली आहे. प्रतीक्षा भांबरे असं आत्महत्या केलेल्या विवाहीतेचं नाव आहे. ती 30 वर्षांची आहे. या शिवाय काही गोष्टी पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. 

ट्रेंडिंग बातमी - Jalgaon News: पत्नीला कारखाली फरफटत नेत, अंगाची कातडी सोलली, हैवान पतीचा भयंकर 'कार'नाम!

ही महिला भांबरवाडी या गावातून असल्याचे तिच्या सोबत असलेल्या एका चिट्ठी आणि आधारकार्ड वर दिसून आले आहे. आत्महत्येचे कारण अजूनही स्पष्ट झाले नाही. तर चिठ्ठीवरील मजकूरच्या आधारे पुढील कारवाई पोलीस करत आहेत. परिसरातील बघणाऱ्या काही लोकांनी तात्काळ पोलिसांना बोलवून आणि अग्निशमन दलाच्या जावनांनाच्या मदतीने संध्याकाळी उशिरा बाहेर काढण्यात आले आहे. मृतांना शवविच्छेदानासाठी गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

संपूर्ण बातमी वाचा
Listen to the latest songs, only on JioSaavn.com