मुंबईतील एका श्रीमंत 'भिकारी'चा हत्येनं शेवट, मृत्यूपूर्वी कुटुंबाला दिलं आलिशान आयुष्य

मुंबईतील सर्वात श्रीमंत गरिबांपैकी (भीक मागणारी) एक शांताबाई कुराडे यांची गेल्या आठवड्यात राहत्या घरात हत्या करण्यात आली होती.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

मुंबईतील सर्वात श्रीमंत गरिबांपैकी (भीक मागणारी) एक शांताबाई कुराडे यांची गेल्या आठवड्यात राहत्या घरात हत्या करण्यात आली होती. शांताबाई या मालाड पश्चिमेला चिंचोली बंडर भागातील विठ्ठल नगरमध्ये भाड्याच्या घरात राहत होत्या. त्या 35 वर्षांपासून मुंबईत भीक मागण्याचं 'काम' करीत होत्या. पतीच्या मृत्यूनंतर भीक मागून त्यांनी आपल्या एकुलत्या एका मुलीचं लग्न केलं. इतकच नाही तर भीक मागून त्या प्रत्येक महिन्याला आपल्या मुलीच्या घरी 25 ते 30 हजार रुपये पाठवत होत्या. याच पैशांमधून त्यांच्या मुलीने घर बांधलं होतं आणि तीन एकर जमीन खरेदी केली होती. आज शांताबाई यांची नातवंड त्या प्लॉटमुळे लाखोंमध्ये कमावतात.   

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शांताबाई कुराडे यांचा मृतदेह शुक्रवारी सकाळी त्यांच्या राहत्या घरात सापडला. मालाड पोलिसांनी या प्रकरणात हत्येसह अनेक कलमं दाखल केली आहेत. याप्रकरणात आरोपी बैजू महादेव मुखिया याला पोलिसांनी शांताबाई हत्या प्रकरणात अटक केली आहे. शांताबाई यांच्यापूर्वी हा 45 वर्षीय आरोपी याच घरात भाडेतत्वावर राहत होता. भाडं न दिल्याने घरमालकाने त्याला घर सोडायला सांगितलं. इतकच नाही तर महादेवने भाडं न दिल्याने घरमालकाने त्याचं सामान देण्यास नकार दिला.   

Advertisement

कशी झाली शांताबाईची हत्या?
मिड डेमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, आरोपी महादेव आपलं सामान घेऊन जाण्यासाठी रात्री गुपचूप घरात दाखल झाला. घरात शिरताच त्याची नजर शांताबाई कुराडे यांच्यावर गेली.  त्या झोपल्या होत्या. शेजारी पैशाने भरलेली बॅग होती. आरोपीने पैशाने भरलेली बॅग चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळेत शांताबाई या झोपेतून जाग्या झाल्या आणि महादेव बॅग चोरत असल्याचं पाहून आरडाओरडा करू लागल्या. यानंतर आरोपी त्यांना शांत करण्यासाठी शांताबाई यांच्या तोंडात कपड्याचा बोळा कोंबला आणि डोक्यावर वार केले. यानंतर महादेव त्यांची हत्या करून फरार झाला.   

Advertisement

नक्की वाचा - 12 वर्षांच्या मुलीने नायट्रोजन पान खाल्लं, थेट ऑपरेशन करण्याची पाळी आली

भाड्याच्या घरात राहत होती महिला...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हत्येचा तपास करण्यासाठी 50 सीसीटीव्ही फुटेज पाहण्यात आले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हत्येच्या रात्री आरोपी चपलांशिवाय दिसला. यानंतर तपासाने वेग घेतला आणि आरोपीला विजयवाडा भागातून अटक करण्यात आली. सुरुवातीला तो पोलिसांना खोटी माहिती देत होता. मात्र चौकशीदरम्यान त्याने हत्येची कबुली दिली. आरोपी महादेव बिहारचा राहणारा आहे. तो गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत राहतो आणि मजुरीचं काम करतो. शांताबाई राहत असलेल्या घरात महादेव राहत होता. भाडं न दिल्याने घरमालकाने त्याला घराबाहेर काढलं होतं. आणि त्यानंतर चार हजार रुपये महिना यानुसार शांताबाईला घर भाड्याने दिलं. शांताबाईने घरमालकाला 15 हजार रुपयांचं डिपॉजिट दिलं होतं.  

Advertisement