
मनोज सातवी, प्रतिनिधी
खोल समुद्रात मच्छीमारी करून परतत असताना गुजरातमधील निराली या बोटीचा खोल समुद्रात अपघात झाला आहे. या अपघातात पालघरमधील चार मच्छीमार खलाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात मृत्यू पावलेले चारही खलाशी हे पालघरच्या घोलवड पोलीस ठाणे हद्दीतील झाई येथील रहिवाशी आहेत. या अत्यंत दुर्देवी अशा अपघातात अक्षय वाघात, अमित सुरम, सुरज वळवी आणि सूर्या शिंगडा या चार जणांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. तर अनिल वांगड आणि जलाराम वळवी यांना बाहेर काढण्यात गुजरात प्रशासनाला यश आलं आहे.
नक्की वाचा - Mumbai Crime : महिला सुरक्षा वाऱ्यावर; मुंबईतील 12 वर्षांच्या शाळकरी मुलीवर पाच जणांकडून लैंगिक अत्याचार
मिळालेल्या माहितीनुसार, या बोटीतून एकूण सात खलाशी प्रवास करीत होते. अपघात झाला तेव्हा ते खोल समुद्रात होते. मच्छिमारी करून परतत असताना या बोटीला दुर्घटना झाली. दुर्घटनेचं नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. या अपघातात अक्षय वाघात, अमित सुरम, सुरज वळवी आणि सूर्या शिंगडा या चार जणांचा बुडून मृत्यू झाला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world