जाहिरात

Safer Car : सुरक्षित कार पुरेशी असते का? कंपनीचे CEO आणि अख्खं कुटुंब संपलं, अनेक सवाल उपस्थित!  

वडिलांना भेटण्यासाठी हे सीईओ सांगली जिल्ह्यात येत होते.

Safer Car : सुरक्षित कार पुरेशी असते का? कंपनीचे CEO आणि अख्खं कुटुंब संपलं, अनेक सवाल उपस्थित!  
सांगली:

बंगळुरूजवळ शनिवारी 21 डिसेंबर एक भीषण अपघात झाला. या अपघातात वॉल्वो एसयूव्हीमधून प्रवास करणाऱ्या सहा जणांचा मृत्यू झाला. या अपघातावरुन एक गोष्ट प्रकर्षाने समोर आली की, जोपर्यंत रस्ते सुरक्षित होत नाहीत तोपर्यंत कार सुरक्षित असली तरी काहीही फरक पडत नाही. कार सुरक्षा प्रकरणात गोल्ड स्टँडर्डसाठी ओळखली जाणारी वॉल्वो XC90 ला नेलमंगला-तुमकुरू राष्ट्रीय हायवेवर एका कंटेनर ट्रकने चिरडलं. कंटेनरने दुभाजक पार करीत एसयूव्हीला चिरडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Car Fire : पेटत्या कारच्या काचा फोडल्या अन् चौघांना वाचवल, उज्जैनला जाणाऱ्या कुटुंबासोबत नेमकं काय घडलं?

नक्की वाचा - Car Fire : पेटत्या कारच्या काचा फोडल्या अन् चौघांना वाचवल, उज्जैनला जाणाऱ्या कुटुंबासोबत नेमकं काय घडलं?

या अपघातात मृतांमध्ये चंद्रम येगापागोल (48), त्यांची पत्नी गौराबाई (42), त्यांचा मुलगा ज्ञान (16), मुलगी दीक्षा (12), वहिनी विजयलक्ष्मी (36) आणि आर्य (6) यांचा मृत्यू झाला. चंद्रम येगापागोल बंगळुरूतील ऑटोमोटिव्ह सोल्यूशन फार्म IAST सॉफ्टवेअर सोल्यूशनचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होते. दोन महिन्यांपूर्वीच त्यांनी एसयूव्ही खरेदी केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, हे कुटुंब चंद्रम येगापागोलहून वडिलांना भेटण्यासाठी महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात येत होते. ते सावधपणे कार चालवित होते. 

हायवेवर अचानक कारने मारला ब्रेक...
या अपघातात जखमी झालेल्या कंटेनर ट्रकचा ड्रायव्हर आरिफने माध्यमांशी बोलताना सांगितलं की, हावयेवरुन जात असताना त्याच्या समोरील एका कारने अचानक ब्रेक मारला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नान मी गाडी उजव्या बाजूला वळवली. माझी गाडी दुभाजक पार करून पुढे गेली. यानंतर माझा ट्रक समोरून येणाऱ्या दुधाच्या ट्रकला धडकला. पुढे जात माझ्या ट्रकने दुधाच्या ट्रकच्या मागून येणाऱ्या वॉल्वो कारलाही चिरडलं. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

या दुर्घटनेनंतर सोशल मीडियावर यावरुन मोठी चर्चा सुरू आहे. ही सर्वात सुरक्षित कार आहे, मात्र तरीही लोकांचा जीव वाचला नाही. जोपर्यंत रस्त्यावरील सर्वजण सुरक्षितपणे गाडी चालवित नाहीत, तोपर्यंत कोणीही सुरक्षित नाही. 


सर्वात सुरक्षित कारमधील सर्व प्रवाशांचा मृत्यू..
सुरक्षित ड्रायव्हिंगबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणाऱ्या एका सोशल मीडिया अकाऊंटवरुन या अपघाताचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलंय की, रस्त्यावर सुरक्षित राहणं केवळ सुरक्षित कार चालवून होत नाही. सुरक्षित रस्ते+ सुरक्षित ड्रायव्हर+ सुरक्षित कार.. सुरक्षेसाठी या तिन्ही गोष्टी आवश्यक आहेत. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: