जाहिरात

Mumbai Crime: वसई बीचवर अत्याचार, गुप्तांगात ब्लेड अन् खडे; क्रुर घटनेने मुंबईत खळबळ

डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. धक्कादायक म्हणजे मुलीच्या शरीरामध्ये ब्लेडचे तुकडे तसेच खडेही आढळल्याचं समोर आले आहे.

Mumbai Crime: वसई बीचवर अत्याचार, गुप्तांगात ब्लेड अन् खडे; क्रुर घटनेने मुंबईत खळबळ

बीड: मुंबईमधील वीस वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 21 जानेवारी रोजी एका रिक्षा चालकाने तरुणीसोबत हे भयानक कृत्य केल्याचे समोर आले असून वसईमधील राममंदिर परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी रिक्षा चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरु आहे. वनराई पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

समोर आलेल्या माहितीनुसार,  गोरेगावच्या राम मंदिर रेल्वे स्थानक परिसरात एक वीस वर्षीय तरुणी बेशुद्धावस्थेत सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर या तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले, डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. धक्कादायक म्हणजे मुलीच्या शरीरामध्ये ब्लेडचे तुकडे तसेच खडेही आढळल्याचं समोर आले आहे. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरु झाला.

पोलिसांनी नमुद केलेल्या तक्रारीनुसार, ही मुलगी 21 जानेवारी 2025 रोजी वसई येथे बीचवर  फिरायला गेली गेली होती. यावेळी ती एकटी असल्याचा फायदा घेत एका रिक्षा चालकाने तिच्यावर अत्याचार केला. तसेच ब्लेडने तिच्यावर हल्लाही केला तसेच तरुणीच्या गुप्तांगात दगडही आढळून आले आहेत. अत्याचारानंतर तरुणीला बेशुद्धावस्थेत सोडून त्याने पळ काढला. या घटनेनंतर 22 जानेवारी रोजी मुलगी गोरेगावच्या राममंदिर स्थानकाजवळ आली असता काही प्रवाशांनी तिला पाहिले आणि पोलिसांना याबाबतची माहिती दिली. 

(नक्की वाचा-  Ram Gopal Verma: चित्रपट निर्माता रामगोपाल वर्माला जेलमध्ये जावं लागणार, कारण काय?)

तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, वनराई पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेत गुन्ह्याच्या तपासाकरिता पथके तयार केली.  पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे  राजरतन सदाशिव वायवळ, वय 32 यास खैरपाडा, वालीव इथून ताब्यात घेतले आहे. आरोपीची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु असून वनराई पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहे.  

दरम्यान, पीडीत तरुणी ही घरातून पळून गेल्यानंतर हा भयंकर प्रकार घडल्याचेही सांगण्यात येत आहे. तसेच  तक्रारदार तरुणी वारंवार आपले स्टेटमेंट बदलत आहे तसेच  याआधी देखील असे प्रकार केल्याचे पोलीस तपासातून समोर येत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. त्यादृष्टीनेही पोलीस तपास करत आहेत.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com