एक तरूणी आपल्या कॉलेजहून निघाली होती. त्यावेळी तिला धावत्या ऑटोरिक्षामध्येच लुटण्याचा प्रयत्न झाला. खोटा पोलीस बनून एका भामच्याने तिला लुटण्याचा प्रयत्न केला. पण तिच्या एका डेअरिंगने त्याचा खेळ खल्लास झाला. त्याने या तरूणीकडे एक दोन नाही तर पन्नास हजाराची मागणी केली होती. तिच्या बरोबर घडलेली घटना ही अंगावर काटा आणणारीच आहे. मात्र तिने दाखवलेल्या धैर्यामुळे या खोट्या पोलिसाचा पर्दाफाश झाला. त्याला 12 तासाच्या आता अटकही करण्यात आली. याबाबत सविस्तर घटना पाहिली तर एक चित्रपटाच्या कथेला शोभेल अशीच आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ज्या तरूणीला लुटण्याचा प्रयत्न झाली ती विले पार्लेतील एका कॉलेजमध्ये शिकते. कॉलेजनंतर जी घरी जाण्यासाठी निघाली. तिने एक ऑटो रिक्षा केली. त्यावेळी तिच्याकडे ई सिगारेट होती. त्याचा ती वापर करत होती. तिच गोष्ट त्या आरोपींनी हेरली. तिच्या रिक्षाचा पाठलाग सुरू केली. शेवटी एक आरोपी तिच्या रिक्षात चढला. त्याने तिला अटक करण्याची धमकी दिली. अटक व्हायची नसेल तर 50,000 रूपये दे अशी मागणी केली. मात्र तरूणीने आपल्याकडे ऐवढे पैसे नाहीत असे सांगितले. त्यावर तुझ्या मित्रांकडून 10,000 रूपये घे असे सांगितले.
त्यावर त्या तरूणीने आपल्या मित्रांना फोन लावण्या ऐवजी भावाला फोन लावला. सर्व हकीगत सांगितली. तिच्या सांगण्यावरून भावाला हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे लक्षात आले. त्याने तसे त्या तरूणीला सांगितले. शिवाय त्याचा व्हिडीओ काढण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्या तरूणीने ऑटो रिक्षामध्येच व्हिडीओ काढण्यास सुरूवात केली. त्यात एक माणूस आपल्याकडे पैसे मागत आहे. शिवाय तो पोलिस असल्याचे सांगत आहे. मला पोलिस स्टेशनला घेवून जाण्याची धमकी देत आहे. मात्र लेडी पोलिस असेपर्यंत आपण जाणार नाही असेही ती या व्हिडीओत सांगत आहे. शिवाय आपण एमआयडीसी सिप्झ रोडवर असल्याचे ही तिने सांगितले. त्याच्याकडे तरूणीने आयडी कार्ड मागितले होते. पण त्याने ते दाखवले नाही.
त्यानंतर तिने मोबाइलचा कॅमेरा त्या आरोपीच्या दिशेने केला. त्यात त्याचा चेहरा कैद झाला. त्यावेळी त्याने तिचा मोबाइलवर हात ठेवण्याचा प्रयत्न केला. आपण आता फसलो गेलो आहोत याची त्याला कल्पना आली. त्याने तिला कॅमेरा बंद करण्यास सांगितले. पण तिने तसे केले नाही. शेवटी धावत्या ऑटो रिक्षातून त्याने उडी मारली. तो व्हिडीओ त्या तरूमीने ट्वीट केला. शिवाय मुंबई पोलिसांना टॅगही केला. तो व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला.
ट्रेंडिंग बातमी - मविआत फूट? 'ते' दोन पक्ष बाहेर पडणार? एकाने उमेदवार जाहीर केला तर दुसऱ्याने थेट...
याबाबत तरूणीने पोलिसात तक्रार दाखल केली. झालेला सर्व प्रकार पोलिसंना सांगितला. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं. त्यानंतर बारा तासानंतर आरोपीला अंधेरीतून अटक करण्यात आली. दिलशाद खान असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्या बरोबर त्याचे अन्य दोन साथिदार सिमरनजित सिंग आणि रफिक चौधरी यांनाही साकीनाका,जोगेश्वरीतून अटक करण्यात आली आहे. दिलशान खान याच्या विरोधात या आधीही विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. हे प्रकरणाचा छडा बारा तासाच्या आत लावल्याचे डीसीपी सचिन गुंजाल यांनी सांगितले. अटक करण्यात आलेले आरोपी हे महापालिकेत क्लिन अप मार्शल म्हणून कंत्राटी कामगार आहेत.