विशाल पाटील, प्रतिनिधी:
Mumbai Crime: प्रेमसंबंधातील (Love Relationship) वाद विकोपाला जाऊन मुंबईच्या काळाचौकी (Kala Chowki) परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर घटना समोर आली आहे. एका तरुणाने आपल्या प्रेयसीवर जीवघेणा हल्ला (Deadly Attack) केल्यानंतर, त्याच शस्त्राने स्वतःलाही मारून घेत आयुष्य संपवल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेत जखमी झालेल्या मनीषा यादव (Manisha Yadav) या महिलेला तातडीने रुग्णालयात (Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
नेमकं काय घडलं?
समोर आलेल्या माहितीनुसार, सोनू बरई आणि मनीषा यादव यांच्यात प्रेमसंबंध होते. मात्र, मृत तरुण सोनू हा मनीषावर वारंवार संशय (Suspicion) घेत होता. याच संशयावरून सुमारे आठ दिवसांपूर्वी (8 Days Ago) दोघांमध्ये मोठा वाद झाला होता आणि या वादानंतर त्यांचे ब्रेकअप (Breakup) झाले होते. ब्रेकअप झाल्यानंतर सोनू बरईने मनीषा यादवला 'शेवटच्या भेटीसाठी' (Last Meeting) एका नर्सिंग होमजवळ बोलावले होते.
Pimpri Chinchwad: बायकोला नगरसेवक बनवायचे होते, तिनेच घात केला; नवऱ्याची गळा आवळून हत्या
या भेटीदरम्यान दोघांमध्ये पुन्हा जोरदार वाद झाला. यावेळी राग अनावर झालेल्या सोनूने मनीषावर धारदार शस्त्राने (Sharp Weapon) वार केले. मनीषावर जीवघेणा हल्ला केल्यानंतर, त्याच धारदार शस्त्राने तरुणाने स्वतःलाही मारून घेत आयुष्य संपवले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Pune News: NDA मध्ये आणखी एका विद्यार्थ्याचा मृत्यू; दोन आठवड्यात दुसरी घटना, खळबळ
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world