 
                                            - जीतेंद्र दीक्षित, एक्झिक्युटिव्ह एडिटर, NDTV नेटवर्क
Mumbai Crime News: 2008 हे वर्ष आपल्या भारत देशासाठी रक्तरंजित वर्ष ठरलं, असे म्हटलं तर चुकीचे ठरणार नाही. कारण जयपूर, बंळगुरू, अहमदाबाद, नवी दिल्ली आणि गुवाहाटी यासारखी अनेक मोठी शहरं साखळी बॉम्बस्फोटांनी हादरली होती, ज्यामध्ये शेकडो निष्पाप लोक मृत्यूमुखी पडले आणि कित्येकांना अपंगत्व आले. दुसरीकडे मुंबईसारखे गजबलेले शहर शांत होते. जुलै 2006 मध्ये झालेल्या रेल्वे साखळी बॉम्बस्फोटानंतर मुंबईमध्ये दहशतवादाशी संबंधित कोणत्याही घटनांची नोंद झाली नव्हती. देशभरातील अनेक बॉम्बस्फोटांची जबाबदारी घेणाऱ्या इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचे मुंबापुरीशी कनेक्शन असले तरी त्यांच्या राक्षसी कृत्यांपासून हे शहरही वंचित राहू शकलेले नाही.
"ये बंबई शहर हादसों का शहर है" बॉलिवूडमधील हे लोकप्रिय गाणे मुंबईला दुर्घटनांचे शहर असल्याचे अधोरेखित करते. या गाण्याच्या दाव्यानुसार मुंबई शहर जास्त काळ शांतता टिकवून ठेवू शकलेले नाही. 2008 वर्षाच्या सुरुवातीच्या काही महिन्यांच्या शांततेनंतर सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीती आणि चिंतेची लाट पसरू लागली.
वर्ष 2008: मुंबई बस अपहरणाचा थरारक अनुभव (2008: The Bus Hijacking)
27 ऑक्टोबर 2008 रोजी सकाळी 10.30 वाजता कुर्ला परिसरातील 332 क्रमांकाच्या डबल डेकर बेस्ट बसचे अपहरण (Kurla Double Decker Bus Hostage News) झाल्याची बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरली. प्राथमिक माहितीनुसार, 12 प्रवाशांना ओलिस ठेवण्यात आल्याचे समजलं आणि यापैकी एकाला गोळीही लागली होती. संपूर्ण भारतात रक्तपात केल्यानंतर इंडियन मुजाहिद्दीन दहशतवादी संघटना आता मुंबईत परतलीय की काय? या विचाराने मला काळजी वाटू लागली. तेव्हाच स्थानिक पोलिसांमधील एका सूत्राचा फोन आला की अपहरणकर्ता मीडियाशी बोलू इच्छित आहे. घाईघाईने मी 14 किलोमीटर अंतर दूरवर असलेल्या घटनास्थळी पोहोचण्यासाठी निघालो. माझा सहकारी उमेश कुमावत दुसऱ्या एका घटनेचे वार्तांकन करत होतो, त्यानंही तेथे धाव घेतली.
मुंबईतल्या डबलडेकर बसमध्ये एन्काउंटर
ओलिस ठेवणारा व्यक्ती मीडियाशी बोलणी करणार आणि यासारख्या गोष्टीचे रिपोर्टिंग करायचंय या विचाराने मी रोमांचित झालो. मनातल्या मनात अपहरणकर्त्याला ओलिसांना सोडवण्यासाठी आणि पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्यासाठी कसे पटवून द्यावे, याची तयारी करू लागलो. उत्तम असे काहीतरी शिकायला मिळेल, असे त्यावेळेस मला वाटले. पण वाहतूक कोंडीतून मार्ग काढत घटनास्थळी पोहोचेपर्यंत सर्व काही संपले होते. ओलिस ठेवलेल्या व्यक्तींना वाचवण्यात आले, बसभोवतीचा परिसर पोलिसांनी ताब्यात घेतला होता, अपहरणकर्त्याचे एन्काउंटर करण्यात आले आणि त्याचा मृतदेह रुग्णालयात नेण्यात येत होता. त्यावेळेस बसजवळ उभे असलेल्या ACP मोहम्मद जावेद यांना पाहिले, त्यांच्या हातामध्ये रिकामी असलेले सर्व्हिस रिव्हॉल्व्हर होते. जावेद यांनीच अपहरणकर्त्यावर पहिल्यांदा गोळीबार केला आणि पोलीस पथकाला बसच्या आत शिरण्यासाठी मार्ग मोकळा करून दिला.
...अन् पोलिसांनी अपहरणकर्त्यावर डझनभर गोळ्या झाडल्या
"जेव्हा मी बसमध्ये शिरलो तेव्हा मी पाहिले की अपहरणकर्त्याने एका प्रवाशाला पकडून त्याच्यावर बंदूक रोखली होती. मी त्याला आत्मसमर्पण करण्यास सांगितले, पण त्याने ऐकलं नाही. त्या प्रवाशाचा जीव वाचवण्यासाठी मी काय करायला हवे होते? मला गोळीबार करावा लागला", असे जावेद यांनी मला सांगितलं. जावेद आणि त्यांच्या टीमने अपहरणकर्त्यावर डझनभरहून अधिक गोळ्या झाडल्या, त्यापैकी तीन त्याच्या डोक्यात घुसल्या आणि एक गोळी त्याच्या हृदयातून आरपार गेली.
अपहरणकर्त्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा मारायचं होतं
अपहरण करणारा 25 वर्षीय तरुण कुंदन सिंह उर्फ राहुल राज हा बिहार राज्यातील पाटणा शहरातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुरू केलेल्या उत्तर भारतीयांविरोधल्या द्वेष मोहिमेने त्याचे डोके भडकले होते. त्याच वर्षी प्रक्षोभक भाषणे केल्याच्या आरोपाखाली राज ठाकरे यांना अटक केल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी उत्तर भारतीयांवर हल्ला केला होता. हिंसक जमावाने काही लोकांना मारहाणही केली. रेल्वे भरती परीक्षेसाठी मुंबईत आलेल्या उत्तर भारतीय तरुणांनाही मारहाण करण्यात आली.
अपहरणकर्त्याचा बेछूट गोळी गोळीबार
याच गोष्टींमुळे संतापलेला राहुल राज (Rahul Raj) देशी बनावटीच्या पिस्तूलसह मुंबईला पोहोचला आणि साकीनाका (Sakinaka) येथील बेस्ट बसमध्ये चढला. बस कुर्ल्याला पोहोचताच त्याने पिस्तूल दाखवत बसचा ताबा घेतला आणि वरच्या डेकवर चढला, अनेक प्रवाशांना ओलिस ठेवले. पोलिसांना बसच्या दिशेने येताना पाहून त्याने बेछूट गोळीबार सुरू केला आणि एक गोळी एका प्रवाशाला लागली. आजूबाजूच्या लोकांनी त्याला खिडकीतून ओरडताना ऐकले की त्याचा प्रवाशांना इजा करण्याचा हेतू नव्हता तर त्याला राज ठाकरेंचा (Raj Thackeray) जीव घ्यायचा होता.
बिहारमधील राजकारण्यांचा मुंबई पोलिसांवर आरोप
राहुल राजच्या एन्काउंटरमुळे नवा वाद निर्माण झाला होता आणि बिहार-महाराष्ट्रातील राजकारण्यांमध्ये तीव्र स्वरुपात वाक् युद्ध सुरू झालं. बिहार राज्यातील राजकारण्यांनी या एन्काउंटरचा निषेध करत राहुल राजला जिवंत पकडण्यासाठी मुंबई पोलिसांनी कोणतेही प्रयत्न केले नाहीत, असा आरोप केला. महाराष्ट्र सरकारने प्रत्युत्तर देत म्हटले की पोलिसांनी परिस्थितीनुसार जे केले ते योग्य केले. महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या मुख्य सचिवस्तरीय चौकशीव्यतिरिक्त, याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालय आणि पाटणा उच्च न्यायालयाचेही दरवाजे ठोठावले.
महिन्याभरातच मुंबईत घडली जगाला घाबरवणारी घटना
बस अपहरणाच्या घटनेने मुंबईतील नागरिक, विशेषतः सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणारे सर्वसामान्य लोक धास्तावले असले तरी भूतकाळात शहराने जे सहन केले होते, त्याच्या तुलनेत ही एक किरकोळ घटना होती. त्यावेळेस मुंबईकरांना हे माहीत नव्हते की एका महिन्यानंतर त्यांच्या शहरात असे काहीतरी घडणार आहे, ज्याने संपूर्ण जग हादरणार होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
