Sindhudurg Crime News : मुंबई क्राइम ब्रांचच्या युनिट-7 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आत्माजी सावंत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे पाच वर्षांपूर्वी झालेल्या एका हत्येच्या प्रकरणाचा पर्दाफाश करत 4 आरोपींना अटक केली आहे.आरोपींनी त्यांच्या मित्राची हत्या केल्यानंतर मृतदेह आणि त्याची मोटारसायकल फोंडा घाटातील खोल दरीत फेकून दिली होती आणि त्याला रस्ता अपघाताचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांच्या माहितीनुसार,मृताची ओळख अशपाक मुलाणी उर्फ निहाल,रा.माळशिरस (सोलापूर)अशी आहे. सुरेश चंद्रहास सोनावडेकर,मनोज नारायण भंडगे,अतिश भगवान मोरे,ऋतुराज शेट्टी, अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
मृतदेह आणि दुचाकी फोंडा घाटात फेकली
प्राथमिक तपासात हे प्रकरण रस्ता अपघात म्हणून नोंदविण्यात आले होते.मात्र, मुंबई क्राइम ब्रांचला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे या प्रकरणाचा पुन्हा तपास सुरु करण्यात आला.चौकशीदरम्यान आरोपींनी कबूल केले की,पैशांच्या व्यवहारावरून झालेल्या वादातून त्यांनी सिंधुदुर्गमधील कुडाळ येथील एका हॉटेलमध्ये अशपाक मुलाणी उर्फ निहाल याला बोलावले होते.उशिरा रात्री सर्वांनी मिळून त्याची हत्या केली आणि पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह तसेच त्याची मोटारसायकल फोंडा घाटातील खोल दरीत फेकून दिली.
नक्की वाचा >> Thane News : ठाण्यातील मुंब्र्यात रक्तरंजित घटना, अख्ख्या कुटुंबाला हादरंवून मुलगा झाला फरार
जेणेकरून हे प्रकरण रस्ता अपघात असल्याचे भासावे.हे प्रकरण सिंधुदुर्गमधील कणकवली पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आले होते.अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी कणकवली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे,अशी माहिती गुन्हे प्रकटीकरण-1 चे पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी दिली आहे.