रिझवान शेख, प्रतिनिधी
Thane Crime News : ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथील सम्राट नगरमध्ये एक रक्तरंजित घटना घडली आहे.मुलाने वडिलांवर चाकूने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले आहे. त्यांना गंभीर अवस्थेत जवळच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.त्यांच्या जखमेवर अनेक टाके घालण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. प्राथमिक माहितीनुसार वडिलांचे नाव ख्वाजा शेख (65) आणि मुलाचे नाव मोहम्मद शेख (45) असे आहे.
मुलाने वडिलांच्या मानेवर चाकूने वार केले अन्..
वडील आणि मुलामध्ये एका मुद्द्यावरून वाद निर्माण झाला आणि हा वाद विकोपाला गेला ज्यात मुलगा मोहम्मद शेखने वडिलांच्या मानेवर चाकूने वार केले या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.ज्यामध्ये वडील वडिलांवर निर्घृणपणे हल्ला करताना मुलगा दिसून येत आहे. काल मध्यरात्री ठाण्यातील मुंब्रा येथील सम्राट नगर परिसरामध्ये बुधवारी रात्री घटना घडल्याचे सांगितले जात आहे.
नक्की वाचा >> Badlapur News: बदलापुरात डबल मर्डर, ओला चालक अन् महिलेसोबत काय घडलं? लहान मुलाच्या जबाबाने पोलिसही हादरले
परिसरात दहशतीचे वातावरण
या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.एक मुलगा आपल्या वडिलांशी इतका क्रूरपणे कसा वागू शकतो आणि धारदार शस्त्राने वडिलांवर हल्ला करण्यास त्याला कोणी प्रवृत्त केले, असा प्रश्न उपस्थित होत आहे? वडील रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत.वडिलांवर हल्ला करणारा मुलगा घटनेपासून फरार आहे.मुंब्रा पोलीस या रक्तरंजित घटनेच्या व्हायरल व्हिडिओची चौकशी करत आहेत. मुलाने वडिलांवर हल्ला का केला.पुढील तपास मुंब्रा पोलिसांच्या माध्यमातून केला जात आहे.
नक्की वाचा >> 'तुझ्यासाठी कोण महत्त्वाचं? मी की ऑफिस?', 7 वर्षाच्या मुलाच्या प्रश्नानं आई गहिवरली, 'तो' प्रॉमिसही विसरली
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world