मुंबई येथील गोराई बीचवर (Mumbai Gorai Beach) एका मृतदेहाचे सात तुकडे आढळल्याने खळबळ उडाली आहे. एका प्लास्टिकच्या पिशवीत हे तुकडे भरून ठेवले होते. बाबरपाडा या भागातील झुडूपांमध्ये ही गोणी सापडली. मृतदेहातून दुर्गंधी पसरल्याने स्थानिकांनी तपास केला असताना एका गोणीमध्ये मृतदेहाचे तुकडे आढळले. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात गोराई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखले केला आहे.
नक्की वाचा - रात्रीची पार्टी जीवावर बेतली, गजानन काळेंचा मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी गोणीतून मृतदेह बाहेर काढला तेव्हा मृतदेहाचे सात तुकडे करण्यात आले होते. मृतदेहाचे हात-पाय धड, डोकं अवयव वेगवेगळे करण्यात आले होते. मृतदेहाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह ताब्यात घेतला. सध्या हा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे यासंदर्भात गोराई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या व्यक्तीला कोणी मारलं, का मारलं, मृत व्यक्ती कोण आहे, याचा तपास पोलिसांकडून घेतला जात आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
हातावरील टॅटूने गूढ वाढलं..
मृत व्यक्तीच्या उजव्या हाताच्या मनगटावर विशिष्ट अक्षरं कोरलेली आहेत. मनगटावर R A असं कोरलेलं आहे. याशिवाय मृत व्यक्ती २५ ते ४० वयोगटातील असून तिने निळ्या रंगाची जीन्स घातली होती. त्याच्या पायात काळ्या रंगाचे बूटही होते.