जाहिरात

रात्रीची पार्टी जीवावर बेतली, गजानन काळेंचा मृत्यू

विधानसभा निवडणुकीतील उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित पार्टीत एका नेत्याचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

रात्रीची पार्टी जीवावर बेतली, गजानन काळेंचा मृत्यू
वरोरा:

सध्या राज्यभरात विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election) प्रचाराचं वारं वाहत आहे. उमेदवार प्रचारासाठी जंग जंग पछाडत आहेत. काही ठिकाणी सेलिब्रेशनही सुरू आहे. अशातच विधानसभा निवडणुकीतील उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित पार्टीत एका नेत्याचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर हळहळ व्यक्त केली जात आहे. एका उमेदवाराच्या प्रचारासाठी पार्टीचं आयोजन केलं होतं. त्यातच नेत्याचा अचानक मृत्यू ओढवला. 

"भाजपची मस्ती वाढली आहे, मी जिरवणार"; महादेव जानकरांचा हल्लाबोल

नक्की वाचा - "भाजपची मस्ती वाढली आहे, मी जिरवणार"; महादेव जानकरांचा हल्लाबोल

ही घटना वरोरा तालुक्यातील फत्तेपूर येथील आहे. येथे प्रमोद मगरे या काँग्रेस कार्यकर्त्याने आपल्या गिट्टी क्रशर परिसरात कार्यकर्त्यांसाठी रात्रीभोजन आयोजित केलं होतं. यात जवळच्या पांझुर्णी येथील माजी उपसरपंच गजानन काळे सहभागी झाले होतं. पार्टी सुरू असतानाच काळे एका सहकाऱ्यासोबत जवळच्या मोकळ्या जागेत गेले. तेथे फिरत असताना ते अचानक विहिरीत पडले. यानंतर अचानक मोठा आवाज झाला. पार्टीच्या ठिकाणी असलेल्या मोठ्या जमावाने आवाजाच्या दिशेने धाव घेतला. 

Latest and Breaking News on NDTV

सहकाऱ्याला एकाला पोहता येत असल्याने तो सुखरुप विहिरीच्या बाहेर आला. मात्र गजानन काळे बुडाले. यात त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी आज सकाळी मृतदेह बाहेर काढला. दुसरा दिवस उजाडला तरीही अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नाही. त्यामुळे पोलिसांवर दबाव असल्याचे बोलले जात आहे. विहिरीत पडलेल्या व्यक्ती नशेत होत्या का, त्यांना कुणी धक्का दिला का, हा अपघात आहे की घातपात, अशा शंका उपस्थित केल्या जात आहेत. निवडणुकीचा माहोल असताना एका पक्षाच्या पार्टीत अशी घटना घडल्याने उलटसुलट चर्चांना पेव फुटले आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com