कर्जावर दिलेले पैसे परत करत नसल्याच्या वादातून मुंबईमध्ये एक भयंकर प्रकार घडला आहे. एका तरुणाला त्याच्या अल्पवयीन मित्रासोबत अनैसर्गिक संबंध ठेवण्यास भाग पाडण्यात आले. या सगळ्या प्रकाराचे व्हिडीओ शूटींग करण्यात आले आणि ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याचीही धमकी देण्यात आली. दोन आठवड्यांपूर्वी हा प्रकार घडला असून पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणातील अन्य तीन आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिसांनी या घटनेबद्दल माहिती देताना सांगितले की,आरोपींकडून पीडितांनी काही पैसे घेतले होते, याशिवाय आरोपींनी पीडितांवर चोरीचाही आरोप केला होता. या सगळ्याची शिक्षा म्हणून त्यांनी तरुणाला त्याच्या अल्पवयीन मित्रावर बलात्कार करायला लावला.
( नक्की वाचा: चटके दिले, उपाशी ठेवलं... चपाती नीट बनवता येत नसल्याने आईकडून लेकीचा छळ )
नेमकं काय झाले ?
मुंबईतील लोकमान्य टिळक पोलीस ठाण्यात सदर गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पोलीस याघटनेचा अधिक तपास करत आहेत. आरोपींनी पीडितांचे अपहरण केले होते. त्यानंतर एका खोलीत डांबून विवस्त्र करून बेदम मारहाण करण्यात आली. यानंतर या दोघांना अनैसर्गिक संबंध ठेवण्याची जबरदस्ती करण्यात आली असे पोलीस तक्रारीत म्हटले आहे. पीडितांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे, लोकमान्य टिळक मार्ग पोलिस ठाण्यात आरोपींविरोधात लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम आणि भारतीय न्याय संहिता अर्थात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत एका आरोपीला अटक करण्यात आली असून, या गुन्ह्यात सहभागी असलेल्या अन्य तीन जणांचा शोध सुरू आहे. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची पथके विविध ठिकाणी पाठवण्यात आली आहेत.
( नक्की वाचा: नागपुरातील भाजप नेत्याचा मुलगा ड्रग तस्करी प्रकरणी अटकेत )
अल्पवयीन पीडितावर यापूर्वी कुर्ला रेल्वे पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे. त्याला कुर्ला येथील बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे. पोलीस सदर प्रकरणातील आरोप किती खरे आहेत याची सत्यता पडताळून पाहत आहेत.