जाहिरात

Nagpur Crime : व्हिटॅमिन सप्लिमेंटच्या नावाखाली ड्रग्सची तस्करी; नागपुरातील भाजप नेत्याच्या लेकाचा प्रताप उघड

माजी नगरसेवकाचा मुलगा आणि नागपूरचा विख्यात बॉडीबिल्डर असलेल्या संकेत बुग्गेवार याला एमडी तस्करीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

Nagpur Crime : व्हिटॅमिन सप्लिमेंटच्या नावाखाली ड्रग्सची तस्करी; नागपुरातील भाजप नेत्याच्या लेकाचा प्रताप उघड

संजय तिवारी, प्रतिनिधी

नागपूरचा (Nagpur Crime) सुप्रसिद्ध बॉडी बिल्डर आणि जिम ट्रेनर संकेत बुग्गेवार (Sanket Buggewar) याला एमडी तस्करी करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. संकेत अजय बुग्गेवार हा नागपूरचे माजी नगरसेवक अजय बुग्गेवार यांचा मुलगा असून संकेतने नोव्हेंबर 2022 मध्ये दिल्ली येथे बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक आणि मिस्टर इंडिया टायटल जिंकले होते. 

नागपूरच्या आशीर्वादनगर येथील रहिवासी असलेला संकेत थार या स्टायलिश चार चाकी जीपने एमडीची डिलिव्हरी देण्यासाठी गणेशपेठ येथील मध्यवर्ती बसस्थानकाजवळील एका रेस्टॉरंटमध्ये येत आहे, अशी पोलिसांना माहिती मिळाली होती. तो येताच पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्या खिशातून 16.07 ग्रॅम एमडी पावडर मिळाली. पोलिसांनी एकूण 18 लाखांचा मुद्देमाल जप्त करीत त्याला अटक केली आहे. 

Nagpur News : उद्घाटन होण्यापूर्वी उड्डाणपुलाला भलेमोठे भगदाड; नागपुरात शासनाच्या कामाच्या गुणवत्तेचे धिंडवडे

नक्की वाचा - Nagpur News : उद्घाटन होण्यापूर्वी उड्डाणपुलाला भलेमोठे भगदाड; नागपुरात शासनाच्या कामाच्या गुणवत्तेचे धिंडवडे

आशीर्वाद नगर येथील 25 वर्षीय प्रणय बाजारे याने ही पावडर दिल्याचे त्याने पोलिसांसमोर कबुल केले आहे. तो व्हिटॅमिन सप्लिमेंट्सची विक्री करता करता एमडी ड्रग तस्करीकडे कसा वळला याचे पोलिसांना आश्चर्य वाटत आहे.  त्याचे आणखी कुणाकुणाशी संबंध आहेत आणि तो जिम ट्रेनिंग करत असताना नशाखोरी पसरवीत होता काय याची देखील आता पोलीस चौकशी करणार आहेत. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com