
प्रविण मुधोळकर, नागपूर: नागपूरमध्ये माजी शिवसेना जिल्हाप्रमुख अंकुश कडू यांची निर्घृण हत्या करण्यात आली. 19 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता सहा तरुणांनी अंकुश कडू यांचा निर्घृणपणे खून केला. या भयंकर घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या हत्या प्रकरणात आता सर्वात महत्त्वाची अपडेट समोर आली असून एका महिला व्यावसायिकानेच 15 लाखांची सुपार देत हा खून घडवून आणल्याचे उघडकीस आले आहे.
'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी नागपूरमध्ये शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख अंकुश कडू यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचे समोर आले होते. कपिल नगर पोलिस ठाण्यांतर्गत म्हाडा कॉलनीजवळ अंकुश कडू यांच्यावर हल्ला करण्यात आला. 6 हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर वार केले. हल्ल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात उपचार दरम्यान त्यांचे निधन झाले.
याप्रकरणी आता पोलीस तपासातून मोठा खुलासा झाला असून जमिनीच्या वादातून एका महिलेनेच 15 लाखांची सुपारी देऊन ही हत्या घडवून आणल्याचे उघडकीस आले आहे. संगीता गोपीचंद सहारे (वय, 50) असे या महिलेचे नाव असून तिने आठ जणांना 15 लाखांची सुपारी दिली होती, यामधील 10 लाख रुपये मारेकऱ्यांना देण्यात आले होते.
( नक्की वाचा : Vaibhav Suryavanshi : आयपीएलचा इतिहास बदलला, 14 वर्षाच्या मुलानं केलं पदार्पण, पहिल्याच मॅचमध्ये खणखणीत सुरुवात )
हत्या करणाऱ्यांमध्ये सुपारी देणाऱ्या महिलेचा मुलगा आकाश सहारे, अशोक मिश्रा, चालक अश्विन खोलगे, राहुल वाघ, राजेश बोकडे, विलास नंदनवार, धनंजय काटेकर यासह चार अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. आरोपींमध्ये चार अल्पवयीन मुलासह आठ जणांचा समावेश असून या सर्वांना अटक करण्यात आली आहे.
काय होता वाद?
अंकुश कडू आणि संगीता सारे यांचा कामठी रोडवरील 11 एकर जमिनीवरून वाद सुरू होता. हे प्रकरण न्यायालयातसुद्धा होते. निकाल अंकुश कडूच्या बाजूने येईल अशी शंका संगीता सहारेच्या मनात होती त्यातूनच तुम्ही हत्येचा कट रचला. हत्येनंतर घटनास्थळावरुन सीसीटीव्हीमधून एकाचा शोध लागला, त्यानंतर सर्व मारेकऱ्यांचा सुगावा पोलिसांना लागला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world