जाहिरात

अम्मी माझा खूप छळ होतोय... मध्यरात्री 19 वर्षांच्या लेकीचा शेवटचा फोन अन् 30 मिनिटांत सासरच्यांनी केलं भयानक

Nagpur Crime News: लग्नाला अवघे 4 महिने झालेल्या तरुणीचा संशयास्पद मृत्यू. मृत्यूपूर्वी आईला केलेल्या शेवटच्या फोनमुळे आणि गळ्याला बांधलेल्या रुमालामुळे सासरच्या लोकांचे भयानक कृत्य समोर आले आहे.

अम्मी माझा खूप छळ होतोय... मध्यरात्री 19 वर्षांच्या लेकीचा शेवटचा फोन अन् 30 मिनिटांत सासरच्यांनी केलं भयानक
"Nagpur Crime News: नागपुरात खळबळ! सासरच्यांनी रचला हार्ट अटॅकचा बनाव, पण मुलीच्या गळ्यातील 'त्या' गोष्टीमुळे उघड झालं गुपित"
Canva

- प्रवीण मुधोळकर, प्रतिनिधी

Nagpur News: नागपुरातून हुंडाबळीची आणि सासरच्या छळाची एक अंगावर काटा आणणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाला अवघ्या चार महिने झालेल्या एका 19 वर्षीय विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. सासरच्या लोकांनी हृदयविकाराच्या झटक्याने (हार्ट अटॅक) मृत्यू झाल्याचा बनाव रचून घाईघाईत मृतदेहाचे दफनही केले होते. पण माहेरच्यांच्या संशयावरून पोलिसांनी कब्रस्तानातून मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन केले असता, या तरुणीच्या गळा खुणा आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पती आणि दीराला अटक केली आहे.

अम्मी माझा खूप छळ होतोय; मध्यरात्री तरुणीचा शेवटचा फोन (The Victim's Last Phone Call to Her Mother)

मृत 19 वर्षीय तरुणीचा या वर्षीच जानेवारी महिन्यात निकाह झाला होता. लग्नानंतर अवघे काही दिवस चांगले गेले अन् त्यानंतर सासरच्यांनी हुंड्यासाठी तिचा छळ सुरू केल्याचे म्हटले जात आहे. 14 मे रोजी या तरुणीच्या सासरच्यांनी तिच्या आई-वडिलांना फोन करून सांगितलं की तुमच्या मृलीचा हार्ट अटॅकने मृत्यू झालाय. हा फोन येण्याच्या अर्धा तासपूर्वीच तरुणीने तिच्या आईला फोन केला होता. तिने आईला सांगितलं होतं की,"मला खूप त्रास देत आहेत आणि मला आता सहन होत नाहीये". फोनवर बोलत असताना फोन अचानक कट झाला होता.

गळ्याला बांधलेला रुमाल आणि घरच्यांना संशय (Suspicion Raised by a Handkerchief Around the Neck)

मुलीच्या मृत्यूची बातमी ऐकून माहेरचे लोक तातडीने तिच्या सासरी पोहोचले. तिथे त्यांना मुलीचा मृतदेह दिसला, ज्याच्या गळ्याला एक रुमाल घट्ट बांधून ठेवण्यात आला होता. अर्ध्या तासापूर्वी सुखरूप असणाऱ्या मुलीला अचानक हार्ट अटॅक कसा येऊ शकतो आणि तिच्या गळ्याला रुमाल का बांधला आहे, यावरून माहेरच्या मंडळींना संशय आला. पीडितेने आईला केलेल्या फोनमध्ये दीर आपल्याला त्रास देत असल्याचे म्हटले होते. सासरच्या लोकांनी पोलिसांना कोणतीही माहिती न देता घाईघाईने मृतदेहाचा दफनविधी उरकला. पण मुलीचा छळ होत असल्याच्या खात्रीमुळे तिच्या कुटुंबीयांनी 17 मे रोजी पोलिसात अधिकृत तक्रार दाखल केली.

कब्रस्तानातून मृतदेह काढला बाहेर; पोस्टमार्टममध्ये सत्य उघड (Body Exhumed; Autopsy Confirms Murder)

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आणि दफन केलेला मृतदेह कब्रस्तानातून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. तिथेच मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. यादरम्यान तरुणीचा गळा दाबल्याच्या खुणा देखील आढळल्या आहेत. 

(नक्की वाचा : गाढ झोपेत असताना काळाचा घाला, काही मिनिटात ठाण्यातल्या त्या ठिकाणाचा झाला कोळसा! 2 अधिकाऱ्यांचा होरपळून मृत्यू)

लैंगिक छळ आणि हुंड्याची मागणी; पती आणि दीर गजाआड (Dowry Demand and Physical Assault; Husband and Brother-in-law Arrested)

मिळालेल्या माहितीनुसार, या 19 वर्षांच्या तरुणीचा केवळ शारीरिक आणि मानसिक छळच होत नव्हता, तर तिचा लैंगिक छळही केला जात होता. तिचा दीर तिला अमानुष त्रास देत होता, तर नवरा आणि सासरा तिला हुंड्यासाठी मारहाण करत होते.

या प्रकरणाविषयी माहिती देताना पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी सांगितले की, लग्नानंतर महिनाभर सासरचे लोक चांगले वागले. त्यानंतर त्यांनी हुंड्यासाठी विवाहितेचा छळ सुरू केला. पोलिसांनी या प्रकरणी पती, दीर आणि सासरा या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पती आणि दीराला पोलिसांनी अटक देखील केली आहे.

(नक्की वाचा: Video: मुंबईत नालेसफाईवेळी धक्कादायक प्रकार; नाल्यात तो सांगाडा पाहून BMC कर्मचारी चक्रावले! थेट क्रेनच मागवली)

19 वर्ष लाडाकोडात वाढलेल्या या तरुणीचं जीवन अवघ्या चार महिन्यात नरकासमान झालं होतं. नवऱ्यासोबत ती सुखाने नांदेल असं तिच्या घरच्यांना वाटलं होतं. पण सासरच्या मंडळींनी या निष्पाप तरुणीला संपवून टाकलं. पोलीस आरोपींवर कारवाई करतील आणि न्यायालय या तिघांना कठोर शिक्षा देईल इतकी माफक अपेक्षा तरुणीच्या घरच्यांना आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com