बदलापूर शाळेतील चिमुरडीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर लहान मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेने महाराष्ट्राला हादरा बसला. अगदी कोवळा वयातील मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना कडक शिक्षा व्हायला हवी अशी मागणी राज्यभरातून केली जात आहे. दरम्यान नागपुरातून असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
चॉकलेटचे आमिष दाखवून एका 5 वर्षीय मुलीचा विनयभंग झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूरच्या तहसील पोलिसांनी एका 40 वर्षीय नराधमाला पॉक्सो कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ही मंगळवारची घटना असून टिमकी परिसरात चाळीस वर्षीय शेरू टाकळीकर हा पाचपावली रेल्वे ट्रॅक जवळून दोन मुलींना घेऊन जात असल्याचे तेथील लोकांना दिसले. पाच वर्षीय मुलगी त्याच्या कडेवर होती आणि सात वर्षीय मुलगी त्याच्या मागे चालत होती. त्याची आणि मुलींची हालचाल पाहता त्यांचे नातेसंबंध किंवा त्या मुलींची त्याची जुनी ओळख असल्याचे वाटत नव्हते.
नक्की वाचा - मुंबईकरांना पहिल्या पावसाचा फटका, कामात दिरंगाई करणाऱ्या 4 अधिकाऱ्यांवर महापालिकेची कारवाई
चौकशी केल्यावर त्याने दोघींना चॉकलेट हवे असल्यास आपल्यासोबत चालण्यास सांगितले होते. चॉकलेटचे आमिष दाखवून तो त्यांना निर्जन स्थानावर नेण्याचा प्रयत्न करीत होता. नागरिकांनी त्याला एका खांबाला बांधून आधी त्याला मारहाण केली आणि नंतर पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तसेच स्थानिकांनी सतर्कता पळून दोन अबोध मुलींचे आयुष्य वाचविल्या बद्दल त्यांचे अभिनंदन केले. मात्र, कायद्याचे पालन करताना कायदा हातात न घेण्याविषयी देखील बजावले.