जाहिरात

Nagpur Crime: लग्न, फसवणूक, छळ.. युवा महिला कबड्डीपटूने संपवलं आयुष्य; महाराष्ट्रात खळबळ

स्वप्नील याने तिला वेकोलीमध्ये (WCL) नोकरी लावून देण्याचे स्पष्ट आश्वासन दिले होते. मात्र, लग्नानंतरही किरण माहेरीच राहत होती. 

Nagpur Crime: लग्न, फसवणूक, छळ.. युवा महिला कबड्डीपटूने संपवलं आयुष्य; महाराष्ट्रात खळबळ

Nagpur kabaddi player Suicide: नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील माळेगाव येथे युवा महिला कबड्डीपटूने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. किरण सूरज दाढे असे तरुणीचे नाव असून तिने  आर्थिक फसवणूक आणि मानसिक छळाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.  ४ डिसेंबर रोजी कीटकनाशक प्राशन केलेल्या किरणचा उपचारादरम्यान ७ डिसेंबर रोजी मृत्यू झाला, ज्यामुळे या प्रकरणाला अधिक गंभीर वळण मिळाले आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

समोर आलेल्या माहितीनुसार, ​कौटुंबिक आणि आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यासाठी किरणने नोकरी मिळवण्याच्या उद्देशाने स्वप्नील जयदेव लांबघरे याच्याशी २०२० मध्ये नोंदणी पद्धतीने विवाह केला होता. स्वप्नील याने तिला वेकोलीमध्ये (WCL) नोकरी लावून देण्याचे स्पष्ट आश्वासन दिले होते. मात्र, लग्नानंतरही किरण माहेरीच राहत होती. 

सोलापूर-कल्याणदरम्यान सिद्धेश्वर एक्स्प्रेसमध्ये 5 कोटींचे सोने लंपास; कशी घडली घटना?

स्वप्नील नोकरीच्या आश्वासनावर वेळ मारून नेत होता तसेच  त्याबद्दल टाळाटाळ करत होता.  नोकरीचे आश्वासन वारंवार धुडकावले गेल्यामुळे किरण आणि तिच्या कुटुंबात तणाव वाढू लागला. परिस्थिती अधिक बिघडली जेव्हा स्वप्नीलने नोकरी लावून देण्याऐवजी तिच्यावर संबंधांसाठी दबाव टाकणे, शिवीगाळ करणे आणि मानसिक त्रास देणे सुरू केले. या सततच्या छळामुळे किरण मानसिक तणावात होती. 

त्रासाला कंटाळून आत्महत्या

​आपला छळ होत असल्याचे आणि फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यावर किरणने कुटुंब न्यायालयात घटस्फोटाची याचिका दाखल केली होती. मात्र, छळ सुरूच राहिला. या दरम्यान, तिने स्वप्नीलने केलेले मेसेजेस आणि धमक्यांचे सर्व पुरावे आपल्या फोनमध्ये जपून ठेवले होते. अशातच ​४ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता किरणने आपल्या माळेगाव येथील घरी कीटकनाशक प्राशन केले.

Pune News : शिवरायांच्या सिंहगडावर संतापजनक कृत्य; गाडीच्या तपासणीदरम्यान आढळलं...

तातडीने तिला नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान ७ डिसेंबर रोजी तिने अखेरचा श्वास घेतला. ​सावनेर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, लग्नाचे आमिष आणि फसवणूक करून आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या आरोपी स्वप्नील लांबघरे याचा कसून शोध सुरू आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com