संजय तिवारी, नागपूर: क्षुल्लक कारणावरुन हत्या मारामारीच्या घटना राज्यामध्ये सर्रास घडत आहेत. अशीच घटना राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये घडली आहे. मोठा गुंड कोण? या वादातून नागपूरमध्ये तरुणाची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कार्तिक चौबे असे या मृत तरुणाचे नाव असून या हत्येप्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नागपूर शहरातील सक्करदरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत कुख्यात गुंडाची हत्या झाल्याची एक खळबळजनक घटना समोर आली आहे. कार्तिक चौबे असे या हत्या झालेल्या गुंडाचे नाव असून ही हत्या शाहू गार्डन परिसरात झाली. रोशन गायकवाड असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
२8 वर्षीय कार्तिक चौबे एका हत्येच्या प्रकरणात तीन महिन्यापूर्वी तुरुंगातून जामीनावर सुटून आला होता. तुरुंगातून सुटल्यानंतरही त्याच्या गुन्हेगारी कारवाया सुरूच होत्या. काल रात्री, तो त्याच्या काही मित्रांसोबत दारू पित होता. तेव्हा त्याचा सोबत असलेल्या मित्रांशी वाद झाला. सगळ्यात मोठा गुंड कोण? यावरुन त्यांचा वाद पेटला.
(नक्की वाचा- Emotional story: आई वडील भारतात, लेकीला दुबईत फाशी, शेवटचा फोन कॉल अन्...)
याच वादातून कार्तिक चौबेने आधी रोशन गायकवाड याच्या डोक्यात बिअरची बॉटल फोडली. त्यानंतर रोशन गायकवाड याने खिशातील चाकू काढून कार्तिक चौबे याच्यावर सपासप वार केले. ज्यामध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक तपास सध्या सुरु आहे.