व्हिडीओ कॉल जीवावर बेतला; नवऱ्याने डोक्यात रॉड मारून बायकोला संपवलं

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी विकी विर्क आणि मन्नत यांचा प्रेमविवाह झाला होता. त्यानंतर काही दिवस सारे सुरळीत सुरू होते. मात्र पतीला जुगाराचे सवय जडल्याचे सांगितले जाते आणि तो तिच्यावर संशय घेऊ लागल्याने काही दिवसांपासून दोघात वाद सुरू होते.

जाहिरात
Read Time: 2 mins

संजय तिवारी, नागपूर

नागपूरच्या कपिल नगर पोलीस स्टेशन हद्दीत काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. एका संशयातून पतीने रॉडने डोक्याला मारहाण करून आपल्या पत्नीची हत्या केल्याची घटना नागपुरात घडली आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून गुन्हा देखील दाखल केला आहे. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. विकी विर्क असं आरोपी पतीचं नाव आहे. तर मन्नत कौर असं मृत पत्नीचं नाव आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पतीला जुगाराचे व्यसन होते. यासोबतच तो पत्नीच्या चारित्र्यावर देखील संशय घेऊन तिला मारहाण करत असे. पत्नी मन्नत कौर तुलनेत अधिक आधुनिक विचारांची असल्याने ती सोशल मीडियावर सक्रिय होती आणि जिममध्ये सुद्धा जात असे. यामुळे दोघांत वाद होत असत.

(नक्की वाचा - भाजी मार्केटमध्ये राडा, दोन तरूणांना बेदम मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी विकी विर्क आणि मन्नत यांचा प्रेमविवाह झाला होता. त्यानंतर काही दिवस सारे सुरळीत सुरू होते. मात्र पतीला जुगाराचे सवय जडल्याचे सांगितले जाते आणि तो तिच्यावर संशय घेऊ लागल्याने काही दिवसांपासून दोघात वाद सुरू होते. यामुळे कंटाळलेली मन्नत त्याच्यापासून दूर माहेरी राहत होती आणि त्याच्यापासून ती िघटस्फोट घेऊ इच्छित होती. पण त्याला हे मान्य नव्हते. 

तो तिला भेटायला तिच्या माहेरी देखील येत होता. 25 जूनच्या रात्री दोघांमधील वाद विकोपाला गेला. मन्नतने आपल्या जिममधील एका मित्राला व्हिडियो कॉलवर बोलत होती. मात्र मध्येच तिने पती आल्याचे सांगून फोन ठेवला. यावेळी पती विकीने मन्नतवर लोखंडी रॉडने हल्ला केला आणि तिला संपवलं. 

Advertisement

(नक्की वाचा- आतापर्यंत एकही निवडणूक हरले नाही, कोण आहेत ओम बिर्ला ज्यांनी रचला इतिहास)

याप्रकरणी मन्नतच्या धाकट्या भावाच्या तक्रारीवरून आरोपी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. साक्षीदारांची जबानी घेण्यात आल्याचे कपिल नगर पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सचिन धात्रक यांनी सांगितले. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Topics mentioned in this article