जाहिरात

Nagpur Crime: ही विकृती थांबणार कधी? पुण्यानंतर नागपुरात घृणास्पद प्रकार; भररस्त्यात तरुणीसमोरच...

Nagpur Crime: धक्कादायक बाब म्हणजे त्याच्या मोबाईलमध्ये असंख्य अश्लील व्हिडिओ आढळून आले आहेत. पोलिसांनी पुढील कारवाई सुरू आहे.

Nagpur Crime: ही विकृती थांबणार कधी? पुण्यानंतर नागपुरात घृणास्पद प्रकार; भररस्त्यात तरुणीसमोरच...

नागपूर: पुण्यामध्ये गौरव आहुजा नावाच्या तरुणाने गाडी थांबवून भरचौकात लघुशंका केल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला. या बड्या उद्योगपतीच्या मुलाने आपली आलिशान कार थांबवून रस्त्यामध्ये अश्लील चाळे केले. या घटनेने राज्यभरात संतापाची लाट उसळली असतानाच नागपूरमधून असाच घृणास्पद प्रकार समोर आला आहे. नागपूरमध्ये एका तरुणाने तरुणीकडे बघून भररस्त्यात अश्लील चाळे केल्याचे समोर आले आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नागपुरात रविवारी सायंकाळी एका विकृत व्यक्तीने तरुणींसमोर अश्लील वर्तन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यावेळी उपस्थित असलेल्या एका तरुणीने धाडसाने त्या विकृताचे ते कृत्य मोबाईल फोनवर रेकॉर्ड करून ते व्हायरल केल्याने पोलिसांनी त्याचा शोध घेत त्याला अटक केली आहे. 

नागपूर शहरातील वर्धा रोडवरील मध्यवर्ती कारागृहाजवळ जॉगिंग ट्रॅक आहे. रविवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास या जॉगिंगच्या ट्रॅकवर एक तरुणी बसली होती. त्यावेळी तिथेच जवळ बसलेल्या तरुणाने तरुणीकडे पाहत फोनवर बोलताना अश्लील चाळे केले. तरुणीने त्याचा व्हिडिओ काढला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला.

( नक्की वाचा : Maharashtra Budget 2025: शेतीमध्ये AI ते मोफत वीज.. बजेटमधून बळीराजासाठी घोषणांचा पाऊस )

दरम्यान, तरुणीने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर बजाजनगर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.  तीस वर्षीय शांतकुमार नावाची ही व्यक्ती कर्नाटक येथील रहिवासी असून तो नागपुरातील एका हॉटेलमध्ये सहाय्यक मॅनेजर नात्याने काम करतो. धक्कादायक बाब म्हणजे त्याच्या मोबाईलमध्ये असंख्य अश्लील व्हिडिओ आढळून आले आहेत. पोलिसांनी पुढील कारवाई सुरू आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: