Nagpur News: पुण्यानंतर नागपूरकरांमध्ये भीती! चाकूहल्ल्यात 13 वर्षांचा शाळकरी विद्यार्थी गंभीर,आरोपी अल्पवयीन?

Nagpur News: पुण्यात कोचिंग क्लासेसमध्ये दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच आता नागपुरातही गंभीर प्रकार घडलाय. 13 वर्षांच्या शाळकरी विद्यार्थ्यावर चाकू हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आलीय.

जाहिरात
Read Time: 1 min
Nagpur News: विद्यार्थ्यावर चाकूहल्ला, नागपूर हादरलं!
Canva

Nagpur News: पुण्यात कोचिंग क्लासेसमध्ये दहावीच्या विद्यार्थ्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे प्रकरण ताजे असताना आता नागपुरातही शाळकरी विद्यार्थ्यावर चाकूहल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. सीबीएसई इयत्ता आठवीचा विद्यार्थी शाळेतील गॅदरिंग आटोपून घरी जात असताना त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. नागपुरातील नवीन कामठी पोलीस ठाणे परिसरात शुक्रवारी (20 डिसेंबर 2025) संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. जखमी विद्यार्थ्यावर मेयो हॉस्पिटलच्या आयसीयू विभागामध्ये उपचार सुरू आहेत. 

अल्पवयीन मुलांनी हल्ला केला?

घटनास्थळाजवळील एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन अल्पवयीन मुलं पळून जाताना दिसत आहेत, यामुळे या मुलांनीच हल्ला केला असावा, अशी शंका पोलिसांनी व्यक्त केलीय. अर्णव भिमटे असे चाकू हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे.  

(नक्की वाचा: Pune News: पुणे हादरले! पीजीत राहणाऱ्या मद्यधुंद तरुणीवर मालकाची घाणेरडी नजर, पुढे घडला अतिशय संतापजनक प्रकार)

पालकांमध्ये भीतीचं वातावरण

इयत्ता आठवीमध्ये शिकणाऱ्या 13 वर्षांच्या अर्णव भिमटेवर चाकूहल्ला करण्यात आल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालंय. अर्णववर हल्ला झाल्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही फुजेटमध्ये पळणारी मुलं अर्णवच्याच वयाची असल्याचे दिसतंय. त्यामुळे आपापसातल्या वादातून अर्णववर हल्ला झाला असावा, अशीही शंका पोलिसांकडून व्यक्त केली जातेय.  

Advertisement