Nagpur News: नागपूर हादरलं! नात्यातीलच अल्पवयीन मुलांकडून मुलीवर सतत अत्याचार, 1098 क्रमांकामुळे काळं सत्य उघड

Nagpur News: संतापजनक प्रकार उघडकीस, नात्यातीलच मुलीवर महिनो-न्‌-महिने लैंगिक छळ, ब्लॅकमेलिंग, अन् अखेर धक्कादायक घटना उघडकीस.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Nagpur News: नागपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर 3 अल्पवयीन मुलांकडून वारंवार अत्याचार"
Canva

- संजय तिवारी, प्रतिनिधी
Nagpur News: नागपूर जिल्हा एका विचित्र घटनेने हादरलाय. तेलकामठी परिसरात तीन अल्पवयीन मुलांनी नात्यातीलच एका अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. अत्याचाराचे मोबाइलवर चित्रीकरण करून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकीही आरोपींनी पीडित मुलीला दिली होती. चाइल्ड हेल्पलाइनमुळे ही संतापजनक घटना चव्हाट्यावर आलीय. सावनेर पोलिसांनी याप्रकरणी पॉक्सो आणि आयटी अ‍ॅक्टअंतर्गत गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केलाय. तीनही अल्पवयीन आरोपी आणि पीडित मुलगी एकाच गावातील रहिवासी असल्याची माहिती आहे. 

चाइल्ड हेल्पलाइनमुळे धक्कादायक माहिती उघड

सावनेर पोलिसांनी तीनही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतलंय. ऑक्टोबर 2025 पासून ते जानेवारी 2026 पर्यंत पीडित मुलीचा छळ सुरू होता, अशी धक्कादायक माहिती तपासामध्ये समोर आलीय. 

(नक्की वाचा: Nashik News: नाशिक हादरलं! अल्पवयीन मुलगी घरातून निघाली पण परतलीच नाही, पोलिसांनी व्यक्त केली ही भीती)

मुलीच्या मनात आत्महत्येचे विचार सुरू होते, अन्...

पीडित मुलीच्या डोक्यामध्ये आत्महत्येचे विचार सुरू होते. सातत्याने होणारे अत्याचार आणि ब्लॅकमेलिंगमुळे पीडित मुलगी प्रचंड मानसिक तणावात होती. तिनं धाडस करून 1098 या चाइल्ड हेल्पलाइनवर कॉल केला आणि मदतीची मागण केली. यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. यानंतर महिला आणि बाल कल्याण समितीनं तत्काळ पीडितेच्या घरी जाऊन तिचे समुपदेशन केले आणि संरक्षणही देण्यात आले. दरम्यान या संतापजनक घटनेमुळे परिसरात खळबळ उडालीय. 
 

Topics mentioned in this article