जाहिरात

Nashik News: नाशिक हादरलं! अल्पवयीन मुलगी घरातून निघाली पण परतलीच नाही, पोलिसांनी व्यक्त केली ही भीती

Nashik News: नाशिकमध्ये पालकवर्गात भीतीचं वातावरण निर्माण झालंय, कारण येथील अल्पवयीन मुलंमुली बेपत्ता होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतेय.

Nashik News: नाशिक हादरलं! अल्पवयीन मुलगी घरातून निघाली पण परतलीच नाही, पोलिसांनी व्यक्त केली ही भीती
"Nashik News: नाशिकमध्ये अल्पवयीन मुलं होतायेत बेपत्ता"
प्रतिकात्मक फोटो (Canva)

- राहुल वाघ,  नाशिक
Nashik News:
नाशिक शहरातील स्थानिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. कारण येथील अल्पवयीन मुलंमुली बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असल्याचं दिसतंय. दररोज दोन ते तीन अल्पवयीन मुले-मुली बेपत्ता होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. दुसरीकडे नाशिकरोड परिसरातील आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नाशिकरोड भागातील राहत्या घरातून एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. दुपारच्या सुमारास संबंधित मुलगी घरातून कोणालाही काहीही न सांगता बाहेर पडली. पण त्यानंतर ती परतलीच नसल्याने कुटुंबीयांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

(नक्की वाचा: Pune News: पुणे हादरले! विहिरीत 2 लहान मुलांसह विवाहितेचा आढळला मृतदेह , धक्कादायक कारण समोर)

मुलगी घरी न परतल्याने कुटुंबीयांनी परिसरात तसेच नातेवाईकांकडे तिचा शोध घेतला. सर्वत्र शोध घेऊनही ती सापडली नाही. यामुळे अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

(नक्की वाचा: Vasai News: वसई हादरली! पाण्याच्या टाकीतील मानवी हाडांमागील गूढ काय? हत्या की अघोरी कृत्य?)

दरम्यान शहरात अल्पवयीन बेपत्ता होण्याच्या वाढत्या घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com