Nagpur News : 9 तास गर्भकळा, मावशी महिलेच्या छातीवर बसली अन्...; नागपुरात पीडितेच्या पतीचा धक्कादायक आरोप

प्रसुतीकळा आलेल्या महिलेला तब्बल ९ तास वाट पाहायला लावली, इतकच नाही तर अत्यंत अमानवीयपणे महिलेची प्रसुती करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
AI Image

Nagpur News : नागपुरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपुरातील एका शासकीय रुग्णालयात अत्यंत अमानवीयपणे महिलेची प्रसुती करण्यात आली. या घटनेनंतर पीडितेच्या कुटुंबाकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे. प्रसुतीकळा आलेल्या महिलेला तब्बल ९ तास वाट पाहायला लावली, इतकच नाही तर अत्यंत अमानवीयपणे महिलेची प्रसुती करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

महिलेला अमानवीय वागणूक?

नागपूर शहरातील शासकीय डागा रुग्णालयात भयंकर प्रकार समोर आला आहे. प्रसुतीकळा येत असलेल्या दीपलता बनोटे या महिलेला अॅडमिट करून देखील तब्बल नऊ तासांनी प्रसूतीसाठी नेण्यात आलं. रुग्णालयात काम करणाऱ्या एका मावशीने महिलेच्या छातीवर बसून गुडघ्यांनी प्रसूतीचा प्रयत्न केला असा आरोप महिलेच्या पतीने केला आहे. सर्व वैद्यकीय रिपोर्ट्स नॉर्मल असून देखील तिचे बाळ मृत जन्माला आल्याची घटना घडली आहे.

Advertisement

नक्की वाचा - Shocking: आईच्या बँक खात्यातील 45 लाख रुपयांवर डोळा; पोटच्या पोरीनं रचला मृत्यूचा असा सापळा

या प्रकरणी तेथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिलीप मडावी यांनी असा प्रकार घडूच शकत नसल्याचा दावा केला आहे. मात्र कॅमेऱ्यावर बोलण्यास नकार दिला आहे. नेमका काय प्रकार घडला ते महिलेचा पतीने NDTV मराठीला सांगितले. या भागातील नगरसेवक वसीम खान यांनी शासकीय रुग्णालय असून देखील येथे असे प्रकार नियमित घडत असल्याचा दावा केला आहे. दरम्यान शासकीय रुग्णालयाचे अधीक्षक डॉ दिलीप मडावी यांनी कॅमेऱ्यावर बोलण्यास नकार दिला आहे. याशिवाय अशी घटना घडूच शकत नसल्याचा दावा केला आहे.