Nagpur News : वासनांध महिलेचं धक्कादायक कृत्य; वडिलांच्या मृत्यूनंतर अल्पवयीन मुलाचा भयाण अनुभव

नागपूरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात मुलाने थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली.

जाहिरात
Read Time: 2 mins

Nagpur News : नागपूरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका १७ वर्षीय मुलावर मानसिक आणि शारीरिक त्रास देऊन शारीरिक संबंध बनविण्याचा दबाव टाकल्याचा आरोप सावत्र आईवर पोलीस तक्रारीत करण्यात आला आहे. वडिलांच्या निधनानंतर नातेवाईकांनी 17 वर्षीय तरुणाची जबाबदारी त्याच्या सावत्र आईकडे सोपवली होती. मात्र, सावत्र आईने त्याच्यावर भलताच दबाव टाकल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. आरोपी महिलेने मावशीलाही शिवीगाळ केली असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सावत्र आईची शरीरसंबंधासाठी बळजबरी...

नागपूरच्या तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेली ही घटना आहे. या तरुणाच्या आईचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं. मात्र, लग्नाच्या काहीच काळानंतर त्यांचा देखील मृत्यू झाला होता. बी.ए. प्रथम वर्षाचा विद्यार्थी असलेल्या अल्पवयीन मुलाची जबाबदारी नातेवाईकांनी सावत्र आईवर सोपवली होती. तक्रारीत नमूद केल्यानुसार, सावत्र आईने बळजबरीने शारीरिक संबंध ठेवण्याचा दबाव केला. मुलाने याचा विरोध केल्यावर त्याला शिवीगाळ आणि मारहाणीचा सामना करावा लागला. त्याने सावत्र आईच्या अत्याचाराला विरोध केला असता, महिलेने त्याला खोट्या प्रकरणात अडकवण्याची आणि तुरुंगात टाकण्याची धमकी दिली असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

Advertisement

नक्की वाचा - 50 कोटी घेऊन फरार? सुट्टीसाठी परदेशात गेलेले आई-वडील परतलेच नाही; लेकीची पोलिसात धाव

सतत होणाऱ्या या त्रासाला कंटाळून आणि घाबरलेला तरुण अखेर आपल्या मावशीकडे पोहोचला आणि सर्व आपबिती सांगितली. जेव्हा मावशीने याबद्दल महिलेला विचारलं, तेव्हा आरोपी महिलेने तिलाही शिवीगाळ केली. त्यानंतर मावशीने तत्काळ तरुणाला घेऊन तहसील पोलीस ठाणे गाठले आणि अधिकृत तक्रार नोंदवली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. तरुण अल्पवयीन असल्याने पोलिसांनी या प्रकरणी संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.


Topics mentioned in this article