22 मे रोजी नागपुरातील मानेवाडी रोडवरून बालाजीनगरकडे जाणाऱ्या एका भरधाव कारने 82 वर्षीय पुरुषोत्तम पुट्टेवार यांना धडक दिली होती. यात त्यांचा मृत्यू झाला होता. प्रथमदर्शनी अपघात वाटत असला तरी तपासाअंती हा घातपात असल्याचं उघडकीस आलं होतं. धक्कादायक म्हणजे पुरुषोत्तम यांची सून अर्चना पुट्टेवार यांनी सासऱ्याच्या हत्येचा कट रचला होता.
या प्रकरणात नवनवे अपडेट समोर येत आहे. या घटनेत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विभागाचे संचालक प्रशांत पार्लेवार यांना नागपूर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. प्रशांत पार्लेवार हे अर्चना पुट्टेवार यांचे भाऊ आहेत. या दोघांनी मिळून अर्चनांच्या सासऱ्याच्या हत्येचा कट रचल्याचं उघडकीस आलं आहे.
अर्चना ही गडचिरोली नगररचना विभागात सहाय्यक संचालक असून तिने पन्नास लाखांत सासऱ्याच्या हत्येची सुपारी दिली होती. मृत पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या संपत्तीतून हा कट रचल्याची माहिती आहे. त्यांच्या 300 कोटींच्या संपत्तीच्या हव्यासातून त्यांचा काटा काढण्यात आल्याचा प्लान रचण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, मनीष, हेमंत आणि योगिता अशी तीन मुलं आहेत. तिघेही विवाहित असून अर्चना ही मनीषची पत्नी आहे. अर्चना आणि प्रशांत हे भाऊ-बहीण आहे. विशेष म्हणजे योगिताचं लग्न अर्चनाच्या दुसऱ्या भावासोबत झालं होतं. मात्र योगिताच्या पतीचं अपघातात निधन झालं. तेव्हापासून योगिता माहेरीच असते. त्यामुळे या प्रॉपर्टीमध्ये योगिताचाही हिस्सा पडणार होता. त्यासाठी न्यायालयात पाठपुरावा करणाऱ्या सासऱ्याचा काटा काढण्यासाठी अर्चना हिने सुपारी दिल्याचं पोलिसांनी सांगितलं.
नागपूरमध्ये नेमकं काय घडलं?
नागपुरच्या मानेवाडा चौकाजवळ 22 मे रोजी एक 82 वर्षीय वृद्ध पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा मृत्यू झाला होता. प्रथमदर्शनी रस्ते अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता. मात्र पुरुषोत्तम यांच्या बंधुंनी संशय व्यक्त करीत पोलिसांना हत्या केल्याचा संशय व्यक्त केला. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज पाहिले आणि दुसरीकडे पुरुषोत्तम यांचे त्यांच्या नातेवाईकांसोबत संबंध कसे होते याचीही चौकशी सुरू केली. पोलिसांना त्यांचा डॉक्टर मुलगा मनिष याचा कार चालक सार्थक बागडेवर संशय व्यक्त केला.
पोलिसांनी सार्थकला ताब्यात घेऊन चौकशी केली तेव्हा, त्याचे मित्र सचिन धार्मिक आणि नीरज निनावे यांची नावं समोर आली. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं. पोलिसी खाक्या दाखवित दोघांनीही आपला गुन्हा कबुल केला. दोघांनी एका ऑटोमोबाइल फार्ममधून जुनी कार खरेदी केली आणि याच कारने पुट्टेवार यांना चिरडलं. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला.
82 वर्षीय मृत पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्याजवळ 300 कोटींची होती. संपत्तीचा भाग न मिळाल्याने नाराज झालेली सून अर्चनाने सासरे पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या हत्येची सुपारी दिली. सुपारी घेतलेल्यांनी हत्येत ज्या कारचा वापर केला होता, ते खरेदी करण्यासाठी सुनेने पैसे दिले होते. ही हत्या अपघातासारखी वाटायला हवी, असंही तिने आरोपींना सांगितलं होतं. यासाठी तिने आधीच आरोपींना दोन लाख रूपये दिले होते. आरोपींनी प्लानिंग करून हत्येचा प्लान आखला. ही हत्या पोलिसांनाही अपघात वाटत होती. मात्र मृत पुरुषोत्त यांच्या भावामुळे सत्य उघडकीस आलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world