संजय तिवारी
परिस्थिती माणसाला काय काय करायला लावते. त्यातून काही जण चांगल्या मार्गाचा अवलंब करतात. पण काही जण वाम मार्गाला लावून आपलं आयुष्य बर्बाद करतात. या घटना आता नाही तर या आधी ही घडल्या आहेत. काही जण परिस्थितीचा गैर फायदा घेत आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात. अशीच एक धक्कादायक घटना नागपूरात समोर आली आहे. नागपूर पोलीसांनी शरिर विक्री करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. त्यांच्या चौकशीतून जे काही समोर आले आहे त्यातून सर्वच जण स्तब्ध झाले आहे.
ही धक्कादायक घटना नागपूरात घडली आहे. कांचन मोरेश्वर निमजे ही महिला अशा मुलींना शोधायची की त्या अडचणीत आहे. अशा मुलींना हेरल्यानंतर त्यांना झटपट पैशाचे आमिष दाखवायची. मोठ मोठी स्वप्न दाखवायची. कमी वेळात जास्त पैसे मिळणार याला त्या मुली भुलत होत्या. शिवाय परिस्थिती पाहाता दुसरा मार्ग त्यांना दिसत नव्हता. अशा स्थितीत नागपूरातल्या गरिब घरातल्या तीन मुली या कांचन निमजे या महिलेच्या जाळ्यात अडकल्या. या तिन ही मुली जेमतेम वीस वयातल्या होत्या. या मुलींना शरिर विक्रीच्या धंद्यात या कांचनने ढकलले होते. त्यासाठी तिने एक आपलं नेटवर्क उभं केलं होतं.
नक्की वाचा - Viral video: ही अमेरिकन महिला म्हणते भारतात अजिबात जाऊ नका, कारण ऐकून धक्का बसेल
त्यात या मुली कोणत्या हॉटेलमध्ये जातील. ग्राहक तिच्या सोबत कसे संपर्क साधतील. त्यांचा दर काय असेल. लॉजचा दर काय असे किती वेळासाठी मुली तिथे जाणार. त्यांना तिथे कोण घेवून जाणार हे सर्व काही ठरलं होतं. नागपुरातील बेलतरोडी परिसरातील प्रमिला प्रकाश हॉटेल हा त्यांचा या धंद्याचा अड्डा होता. याबाबत नागपूर पोलीसांना कुणकुण लागली होती. त्यातून नागपूर शहर पोलिसांच्या ऑपरेशन शक्ती मोहिमेअंतर्गत ही मोहीम राबवण्याचं ठरलं.
त्यानुसार दोन बोगस ग्राहक तयार करण्यात आले. त्यांनी या कांचन सोबत संपर्क केला. मुली देण्याचे कांचनने मान्य केले. त्यासाठी तिने प्रत्येकी 3 हजार रुपयांची मागणी केली. शिवाय हॉटेल बुकींगचे 2400 रूपये मागितले. त्या आधी ऑनलाईन 3100 रूपये तिने घेतले होते. त्यानंतर कांचन त्या मुलींना घेवून त्या ठिकाणी आली. पोलीस दबा धरून बसले होते. तिथेच पोलीसांनी धाड टाकली. हॉटेलच्या मॅनेजरला ताब्यात घेण्यात आले. कांचनला ही अटक केली. तर त्या वीशीतल्या तीन तरुणींची सुटका करण्यात आली. घरची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे हे कृत्य करावं लागलं असं या तरुणींना चौकशीत सांगितले. त्यांची आता सुटका करण्यात आली आहे.