Nagpur violence : एका युट्यूबरच्या चुकीमुळे घडला नागपूर हिंसाचार? पोलिसांच्या हाती महत्त्वाचे पुरावे

नागपूर येथे 17 मार्च रोजी झालेल्या दंगलीत अफवा पसरविणाऱ्या लोकांचा मोठा हात असल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Nagpur violence : औरंगजेबाच्या कबरीवरुन सुरू झालेल्या वादाची परिणामी नागपूर हिंसाचारापर्यंत पोहोचली. नागपूर हिंसाचाराची घटनेनंतर महाराष्ट्रभरात चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. सोशल मीडियावरुन या संदर्भातील अफवा पसरवल्याचंही सांगितलं जात आहे. नागपूर दंगलीत अफवा पसरविणाऱ्या लोकांचा मोठा वाटा होता. एका युट्यूबरने पोलिसांविरूद्ध निराधार बातम्या पेरून माथी भडकवल्याचं आता उघड झालं आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

नागपूर येथे 17 मार्च रोजी झालेल्या दंगलीत अफवा पसरविणाऱ्या लोकांचा मोठा हात असल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे. अटक झालेल्यांच्या मोबाइल फोनमधून पोलिसांना महत्त्वाची माहिती आणि पुरावे सापडले आहेत. दंगलीच्या दिवशी दुपारपासूनच वेगवेगळ्या ग्रुपवर अफवा पसरविणाऱ्यात आली अशी खळबळजनक माहिती आहे. संदेश पसरविणाऱ्यांद्वारे पोलिसांकडून आमच्या मुलांना मारले जात आहे, लवकर या..; अशा आशयाचे संदेश प्रसारित करण्यात आले होते.

नक्की वाचा - Nagpur violence : नागपूर हिंसाचारातील आरोपी फहीम खानच्या घरावर अखेर बुलडोझर 

अटक करण्यात आलेल्या एका यूट्यूबरने अत्यंत निराधार माहिती व्हायरल केल्याचे आता उघड झाले आहे. मोहम्मद शहजाद खान असे नाव असलेल्या या यूट्यूबरने पोलिसांनीच बॉम्ब फेकल्याची निराधास आणि खोटी माहिती व्हायरल केली होती. त्याशिवाय अनेक निराधार माहिती व्हायरल केल्याचे आता उघड झाले आहे. यामुळे, लोकांमध्ये पोलिसांच्या विरोधात तीव्र संताप पसरला असावा आणि रात्री त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलिसांवर हल्ले, दगडफेक, जाळपोळ आणि हिंसाचार करण्यात आला. या दंगलीत पेट्रोल बॉम्ब आणि तीक्ष्ण शस्त्रांचा सर्रास वापर करण्यात आला होता.

Topics mentioned in this article