जाहिरात

Nalasopara Crime: 'माझा प्रभाग, माझी जबाबदारी' की गुंडगिरी? भाजप नगरसेवकाकडून फेरीवाल्यांना मारहाण

आम्ही महापालिकेला नियमितपणे पावती (टॅक्स) भरतो, आमचा एकही दिवस चुकत नाही, तरीही आमच्यावर हा अन्याय का?" असा सवाल पीडित फेरीवाल्याने केला आहे.

Nalasopara Crime: 'माझा प्रभाग, माझी जबाबदारी' की गुंडगिरी? भाजप नगरसेवकाकडून फेरीवाल्यांना मारहाण

मनोज सातवी, वसई:

Vasai Virar Crime: वसई विरार महानगरपालिकेतील भाजपाचे गटनेता अशोक शेळके यांचा फेरीवाल्यांला माराहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. अशोक शेळके यांनी त्यांच्या प्रभाग क्रमांक २२ मधील  त्यांच्या कार्यकर्त्यांसह  नालासोपारा पूर्वेच्या डी मार्ट परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात 'माझा प्रभाग, माझी जबाबदारी' अंतर्गत एक मोहीम राबवली.

भाजप नेत्याची फेरीवाल्यांना मारहाण

मात्र, या मोहिमेदरम्यान एका फेरीवाल्याचा स्टॉल उलटवून टाकण्यात आला आणि त्याला तसेच त्याच्या मित्राला व ग्राहकांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप पीडित फेरीवाल्यांनी केला आहे. "मी भाजपचा कट्टर समर्थक आहे. मात्र, स्थानिक पातळीवर भाजपचेच लोक कमळाचे फूल लावून गरिबांवर अत्याचार करत आहेत आणि पक्षाचे नाव बदनाम करत आहेत" अशी  संतप्त प्रतिक्रिया पीडित फेरीवाल्यांनी व्यक्ती केली आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण असून पीडित फेरीवाल्यांनी आपली व्यथा आणि संताप माध्यमांसमोर मांडला आहे.

याबाबत शेलके यांनी सांगितले की या फेरीवाल्यांचा प्रचंड त्रास तेथील नागरिकांना होत होता. १०० मिटर मध्ये १५० सिलेंडर चालू होते, एवढे फेरिलाले तेथे आहेत. त्या रस्त्यावरून साधी ॲम्बुलन्स जावू शकत नाही. फेरीवाले महिलांची छेडछाड करतात आणि पालिका कारवाई करण्यास गेल्यावर कारवाई करू देत नही, आमच्या कार्यकर्त्याला त्या फेरीवाल्याने मारहाण केली म्हणून, माझ्याकडून तात्काळ ॲक्शन ला रिॲक्शन घडल्याच शेळके यांनी मान्य केले.

महाराष्ट्राच्या राजकारणात नवा अंक! जूनमध्ये मोठा राजकीय भूकंप? खासदारांची चाचपणी, पडद्यामागे काय घडतंय?

कमळाचे फूल लावून गरिबांवर अत्याचार...

भाजपचे नगरसेवक अशोक शेळके आणि त्यांचे १० ते २० कार्यकर्ते अचानक आले. त्यांनी आमचा खाऊ गल्लीतील स्टॉल पूर्णपणे पाडून टाकला. एवढेच नव्हे तर मला, माझ्या मित्राला आणि तिथे उभ्या असलेल्या ग्राहकांनाही विनाकारण बेदम मारहाण केली. आम्ही महापालिकेला नियमितपणे पावती (टॅक्स) भरतो, आमचा एकही दिवस चुकत नाही, तरीही आमच्यावर हा अन्याय का?" असा सवाल पीडित फेरीवाल्याने केला आहे.

तर, दुसऱ्या एका ज्येष्ठ फेरीवाल्याने अत्यंत भावूक आणि संतप्त होऊन सांगितले, "मी गेल्या १७ वर्षांपासून इथे व्यवसाय करत आहे. आम्ही रस्त्याच्या कडेला धंदा करतो पण कोणालाही त्रास देत नाही. माझी पत्नी दिव्यांग (हॅंडिकॅप) आहे आणि माझ्याकडे महाराष्ट्र शासनाचा परवाना (लायसन्स) देखील आहे. पंतप्रधान स्वनिधी योजनेतून आम्ही कर्ज घेतले आहे आणि त्याचे हप्तेही वेळेवर भरतो.

जर आमचे स्टॉल असेच तोडले गेले आणि आम्हाला मारहाण झाली, तर आम्ही कर्जाचे हप्ते कुठून भरणार? आमच्या मुलाबाळांना काय भरवणार? आम्हाला सन्मानाने जगण्याचा अधिकार नाही का?  असा सवाल करत "मी स्वतः भाजपचा कट्टर समर्थक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या धोरणांवर आमचा विश्वास आहे. मात्र, स्थानिक पातळीवर भाजपचेच लोक कमळाचे फूल लावून गरिबांवर, महिलांवर आणि दिव्यांगांवर अत्याचार करत आहेत आणि पक्षाचे नाव बदनाम करत आहेत." असा घणाघात केला.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com