
मनोज सातवी, प्रतिनिधी
मित्रांसोबत व्यवसाय करण्यासाठी घरून पैसे मिळत नाहीत म्हणून नालासोपाऱ्यातील एका तरुणाने मित्रांच्या मदतीने स्वतःच्याच अपहरणाचा डाव ओळखल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मित्रांच्या मदतीने स्वत:च्या अपहरणाचा बनाव करत घरच्यांकडूनच तीन लाख रुपयांची खंडणी मागितली होती मात्र आचोळे आणि मुंबईतील शिवाजी नगर पोलिसांनी तब्बल 11 तासांच्या राबविलेल्या शोधमोहिमेनंतर या अपहरण नाट्यावर पडदा पडला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
रोहन तिवारी हा 19 वर्षांचा तरुण आई, दोन लहान भाऊ, आणि काकांचा परिवार असे एकत्र कुटुंबात नालासोपार्यात राहते. रात्री अचानक रोहनच्या काकाच्या मोबाईलवर रोहनला मारहाण करत रक्तबंबाळ अवस्थेत बांधून ठेवल्याचा व्हिडिओ आला, त्यानंतररोहन सुखरूप पाहिजे असेल तर अपहरणकर्त्यांनी 3 लाखांची मागणी केली होती. ही रक्कम न दिल्यास रोहनला ठार मारण्यात अशी धमकी दिली होती. विशेष म्हणजे हा व्हिडिओ रोहनच्याच मोबाईलवरुन पाठवला होता. यामुळे भयभीत झालेल्या रोहनच्या कुटुंबीयांनी तात्काळ आचोळे पोलीस ठाण्यात धाव घेतली.
( नक्की वाचा : High Court : 'तूच जबाबदार आहेस' बलात्कार पीडितेला कोर्टानं फटकारलं, आरोपीला दिला जामीन )
या घटनेचे गांभीर्य ओळखून गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशपाल सुर्यवंशी आणि त्यांच्या पथकाने घटनेेचे तात्काळ तपास सुरू केला. आचोळे आणि मुंबईतील शिवाजी नगर पोलिसांनी तब्बल 11 तास राबविलेल्या शोधमोहिमेनंतर रोहन आणि त्याचे दोन मित्र कौशल दुबे आणि निखिल सिंग यांना ताब्यात घेतलं. मात्र या अपहरण नाट्य मागचं कारण काही वेगळे समोर आल्याने पोलीस देखील चक्रावून गेले.
या प्रकरणात रोहन आणि त्याचे दोन मित्र कौशल दुबे आणि निखिल सिंग यांच्या विरोधात आचोळे पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world