जाहिरात

Crime News: किरकोळ वाद, भावाने बहिणीसोबत भयंकर केलं, आठवड्यातील चौथी घटना, नालासोपाऱ्यात खळबळ

सर्वोदय वसाहत, टाकी रोड येथील साईधाम वेल्फेअर सोसायटीमध्ये हा प्रकार घडला. सुप्रिया उर्फ सुरेखा संतोष कानडे (वय ३५ ते ४०) असे मृत महिलेचे नाव आहे.

Crime News: किरकोळ वाद, भावाने बहिणीसोबत भयंकर केलं, आठवड्यातील चौथी घटना, नालासोपाऱ्यात खळबळ

मनोज सातवी, प्रतिनिधी:

Nalasopara Crime: गेल्या काही दिवसांपासून नालासोपारामध्ये भयंकर हत्यांच्या घटनांचे सत्र सुरु आहे, ज्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. मागील आठवडाभरात नालासोपारा परिसरात तीन हत्यांच्या घटना घडल्या आहेत. या प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली असतानाच शहरात चौथी हत्येची घटना घडली आहे. 

भावाने बहिणीला संपवलं 

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  नालासोपाऱ्यात पहाटे सहा वाजता बहिणीची सख्ख्या भावाकडून कोयत्याने वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सर्वोदय वसाहत, टाकी रोड येथील साईधाम वेल्फेअर सोसायटीमध्ये हा प्रकार घडला. सुप्रिया उर्फ सुरेखा संतोष कानडे (वय ३५ ते ४०) असे मृत महिलेचे नाव आहे.

Pune News : पुण्यात भयंकर प्रकार, उच्चभ्रू परिसरातील स्पा सेंटरमध्ये महिलेचा मृत्यू, कारण वाचून हादरूनच जाल

प्राथमिक माहितीनुसार, आरोपी भाऊ अजीत मालूष्टे (वय ३०) याने किरकोळ वादातून बहिणीच्या मानेवर कोयत्याने वार करत तिची हत्या केली. आरोपी मनोरुग्ण असल्याची माहिती समोर येत आहे. घटनेदरम्यान मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ६० वर्षीय आईच्या हात व पाठीला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच तुळींज पोलीस  घटनास्थळी दाखल झाले असून हत्येमागील कारणांचा तपास सुरू आहे.

आठवडाभरातील चौथी हत्या 

दरम्यान, वसई-विरार नालासोपारा परिसरात आठवडाभरात हत्येची चौथी घटना नोंद झाली आहे. याआधी वसईत एका महिलेची तिच्या अल्पवायीन नातलगाकडून (भाच्याकडून) हत्या, त्यानंतर वसईत उलट दिशेने वाहन चालवल्याच्या वादातून तरुणाची हत्या आणि नालासोपारा पश्चिमेत गँगवॉरमधून तरुणाचा खून अशा घटना ताज्या असतानाच ही नवीन घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

नक्की वाचा >> Pune News : पुण्यावर मोठं संकट? स्थानिकांसह प्रवाशांनी राहा अलर्ट, 'या' भागात नागरिकांची पळापळ; Video व्हायरल

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com