
महाविद्यालयात शिकणाऱ्या तीन तरुणी आप-आपल्या मित्रासह लॉजवर गेल्या. तिघीही आपल्या मित्रां सोबत वेगवेगळ्या रुममध्ये ही गेल्या. त्यातील एका तरुणीच्या भावाला याची कुणकुण लागली. ज्यावेळी या मुली रूममध्ये होत्या त्याच वेळी भावाने बहिणीला लॉजवर रंगेहाथ पकडले. त्यानंतर जे काही नाट्य घडले त्याचीच सर्वत्र चर्चा आहे. ही घटना नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात घडली आहे.
अर्धापूर तालुक्यातील एका गावात या तीन तरुणी राहातात. त्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी अर्धापूरला येतात. त्यातील एक तृतीय वर्षात शिकते तर दोघी ह्या द्वीतीय वर्षात शिकतात. 21 जुलै रोजी कॉलेज सुटल्या नंतर दुपारी ह्या तीन तरुणी आपल्या मित्रा सोबत दुचाकी वरुन तामसा रोड येथील हॉटेल गारवा लॉजवर गेल्या. त्यातील एका तरुणीच्या भावाला बहीण लॉजवर गेल्याची माहिती मिळाली. हा भाऊ अल्पवयीन होता. त्याने आपल्या सोबत दोन मित्रांना घेतले. त्यानंतर तो थेट हॉटेल गारवा लॉजवर पोहचला.
नक्की वाचा - Javed Sheikh: काम ड्राव्हरचं, घर पत्र्याचं, तरही 500 कोटीचा मालक, कोण आहे जावेद शेख?
तिथे त्याने त्याच्या बहिणीला सत्ताजी भरकड याच्या सोबत एका खोलीत रंगेहाथ पकडले. त्यानंतर दोघात वाद झाला. यावेळी घाबरलेल्या तरुणीने पहिल्या माळ्यावरुन उडी मारून पळ काढला. यात तिचा एक हाथ मोडला. दरम्यान तरुणीचा अल्पवयीन भाऊ आणि अन्य दोघांनी सत्ताजी मरकड याला लॉजमधून बाहेर आणले. भोकर फाट्याजवळ आणून त्याला मारहाण केली. शिवाय त्याच्या पोटात खंजर भोकसले. यात सत्ताजी मरकड गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तर जखमी तरुणीवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र खरा ट्वीस्ट यानंतर आला. संबंधीत तरूणीने पोलिसांनी वेगळीच माहिती दिली. तिने या तरुणा विरोधात तक्रा दिली आहे. त्यात तीने 21 जुलै रोजी कॉलेज सुटल्या नंतर सत्ताजी मरकड, नितीन सपकाळ आणि शेखर पावडे यांनी तिघींना बळजबरी दुचाकीवर बसवून लॉजवर नेले.शिवाय सत्ताजी मरकड याने अत्याचार केल्याची तक्रार पीडित तरुणीने दिली. त्यावरुन पोलीसांनी सत्ताजी मरकडसह तिघावर अत्याचार आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. तर सत्ताजी मरकड याच्या तक्रारी वरुन अल्पवयीन आरोपीसह तिघांवर जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world