Nanded News: मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात तीन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याच्या घटनेने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी रास्ता रोको, आंदोलने करत आरोपीला कठोर शिक्षेची मागणी केली आहे. डोंगराळेमधील ही घटना ताजी असतानाच आता नांदेडमधून अशीच संतापजनक घटना घडली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, एका 7 वर्षाच्या चिमुकलीवर शिक्षकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नांदेड शहरात घडली आहे. नांदेड शहरातील इंग्रजी माध्यम असलेल्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या 7 वर्षाच्या चिमुकलीवर त्याच शाळेत शिकवणाऱ्या एका शिक्षकाने अत्याचार केल्याची घटना काल 19 नोव्हेंबर रोजी घडली आहे.
Akola News: तरूणीला अर्धवट जाळले, मृतदेह शेतात टाकला, गुढ हत्येचं पोलीसांसमोर कोडं?
गुरुवारी मुलगी ही शाळेत जाण्यासाठी नकार देत होती, मुलीच्या आईने विचारपूस केली असता शिक्षकाने केलेला प्रकार तिने सांगितला,त्यानंतर आज मुलीच्या आईने भाग्यनगर पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे,या तक्रारीवरून त्या शिक्षकावर 64(2), 65(2) ,351(2) Bns , 468 पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान आरोपी शिक्षकास अटक करण्यात आली असून हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवण्याची विनंती न्यायालयाला करणार असल्याची प्रतिक्रिया उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैजंने यांनी दिली आहे. या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली असून पोलिसांनी नराधम शिक्षकाला कठोर शिक्षा करावी, अशी मागणी केली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world