जाहिरात

Nanded News : 'धुरंधर' सिनेमा पाहून बाहेर पडला; थिएटरबाहेरच गोळ्या घातल्या; अरिजित सिंगच्या मृत्यूने खळबळ

नांदेड शहर गँगवॉरनं हादरलं आहे. या तिहेरी हत्याकांडामुळे नांदेडकर दहशतीत आहेत. येथे थिएरटरबाहेर एकाचा, तर सरकारी रुग्णालयात दोघांचा खून झाल्याची माहिती आहे.

Nanded News : 'धुरंधर' सिनेमा पाहून बाहेर पडला; थिएटरबाहेरच गोळ्या घातल्या; अरिजित सिंगच्या मृत्यूने खळबळ
AI Image

योगेश लाठकर, प्रतिनिधी
 

Nanded News : नांदेड शहर गँगवॉरनं हादरलं आहे. या तिहेरी हत्याकांडामुळे नांदेडकर दहशतीत आहेत. येथे थिएरटरबाहेर एकाचा, तर सरकारी रुग्णालयात दोघांचा खून झाल्याची माहिती आहे. शुक्रवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास झालेल्या तिहेरी हत्याकांडानं नांदेड शहरात दहशत पसरली आहे. नांदेडमधल्या डी मार्ट परिसरात असलेल्या ई-स्क्वेअर या सिनेमा थिएटरच्या बाजूलाच हे हत्याकांड घडलंय. 

धुरंधर सिनेमा पाहून थिएटरबाहेर पडला अन् गोळीबार....

नांदेड शहरातील कॅनॉल रस्त्यावर असलेल्या ई-स्क्वेअर परिसर आणि त्यानंतर थेट शासकीय रुग्णालयात तीन खून झाले आहेत. जुन्या वादातून झालेल्या गँगवॉरमध्ये सय्यद आवेज, सय्यद खलील, घनश्याम रेड्डी, मोहम्मद अरबाज आणि इतर हल्लेखोरांनी ई-स्क्वेअरजवळ अरिजित सिंग चव्हाणवर हल्ला केला. तलवार आणि खंजिरीनं झालेल्या हल्ल्यात अरिजित सिंगचा जागीच मृत्यू झाला. गँगवॉरमध्ये ठार झालेला अरिजित सिंग हा दोन मित्रांसोबत धुरंधर सिनेमा पाहण्यासाठी आला होता. हल्लेखोर पाळत ठेवून होते. आधीच केलेल्या नियोजनानुसार अरिजित सिंग सिनेमा पाहून आल्यानंतर हल्लेखोरांनी त्याला मोकळ्या मैदानात गाठलं. तलवार आणि धारदार शस्त्रांनी त्याच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात अरिजित सिंगचा जागीच मृत्यू झाला.  

नक्की वाचा - Pune News : पाण्यात उगवलेला गांजा, पुण्यातील विमानतळावर बँकॉकहून तस्करी केलेला गांजा नेमका काय आहे?
 

खून का बदला खून...

दुसरीकडे हल्लेखोरांमधील सय्यद आवेज सय्यद खलील आणि मोहम्मद अरबाज मोहम्मद फारुख जखमी झाल्यानं पोलिसांनी त्यांना सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं. तेव्हा अरिजित सिंगचा भाऊ सरकारी रुग्णालयात पोहोचला आणि त्या दोघांवर चाकू हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यानं सरकारी रुग्णालयातही एकच खळबळ उडाली आहे. हल्ल्यात दोघांचाही मृत्यू झाला. त्यामुळे खून का बदला खून अशी चर्चा नांदेडमध्ये रंगली. दोन्ही टोळ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी मोठी आहे. एका टोळीतील अनिल पंजाबी हा सध्या तुरुंगात आहे. तर साहिल दोन महिन्यापूर्वी तुरुंगातून बाहेर आला होता. टोळीतील काहींवर आधीही कारवाई झालेली आहे. दुसरीकडे अरिजित सिंग चव्हाण यांच्यावर देखील नऊ गुन्हे दाखल होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

नांदेड शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्यानं सर्वसामान्य नागरिक दहशतीत आहेत. त्यातच शुक्रवारी मध्यरात्री गँगवॉरमधून झालेल्या तिहेरी हत्याकांडानं नांदेड पोलिसांसमोर शहरात शांतता प्रस्थापित करण्याचं आणि गुन्हेगारीला चाप बसवण्याचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com