Nandurbar News: आजारी म्हणून रुग्णालयात नेलं अन् हृदयाचे ठोके झाले बंद; डॉक्टरांमुळे असा वाचला तरुणाचा जीव  

नंदुरबारमधील एका तरुणाला रुग्णालयातच हृदयविकाराचा झटका आल्याचा प्रकार समोर आला आहे. डॉक्टरांनी वेळेत त्याच्यावर उपचार सुरू केल्यामुळे तरुणाचा जीव वाचला आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Nandurbar News : नंदुरबारमधील एका तरुणाला रुग्णालयातच हृदयविकाराचा झटका आल्याचा प्रकार समोर आला आहे. डॉक्टरांनी वेळेत त्याच्यावर उपचार सुरू केल्यामुळे तरुणाचा जीव वाचला आहे. 

नंदूरबार जिल्ह्यातील तळोदा शहरात असलेल्या मंगल श्याम हॉस्पिटल येथे एका तरुणाला आयसीयूमध्ये अॅडमिट करण्यात आलं होतं. तरुणावरील पुढील उपचारासाठी नातेवाईकांशी चर्चा सुरू असताना अचानक युवकाला हृदयविकाराच्या झटका आला. या झटक्यामुळे युवकाने मान टाकली आणि त्याच्या  हृदयाचे ठोके देखील बंद पडले होते.

मात्र डॉक्टर योगेश्वर चौधरी यांच्या तत्परतेमुळे युवकाला जीवनदान मिळाले आहे. डॉक्टर चौधरी यांनी सीपीआर पद्धत वापरून बंद असलेले हृदय व शरीरातील रक्तपुरवठा तत्काळ पूर्ववत केला आणि पुढील उपचारासाठी तरुणाला रुग्णालयात दाखल करून योग्य उपचार करून युवकाचे प्राण वाचवले आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून सर्व स्तरावरून डॉ. चौधरी यांचे कौतुक केले जात आहे.

नक्की वाचा - Pune News : सासरकडून छळ, पुण्यात आणखी एका विवाहितेचा बळी

गोल्डन अवरमध्ये उपचार..

हृदयासंबंधित आजारांमध्ये गोल्डन अवर महत्त्वाचा असतो. या कालावधीत उपचार झाल्यास रुग्ण बचावण्याची शक्यता वाढते. नंदुरबारमध्येही या तरुणाला योग्य वेळेत सीपीआर देण्यात आला. विशेष म्हणजे तो रुग्णालयात असल्याने तेथे तज्ज्ञ मंडळी उपस्थित होती. त्यामुळे त्यांनी तातडीने तरुग्णावर उपचार करून त्याचा जीव वाचवला. 

Advertisement
Topics mentioned in this article