
प्रशांत जव्हेरी, प्रतिनिधी
Nandurbar accident : आज धनत्रयोदशी. दिवाळीचा दुसरा दिवस. या आनंदाच्या दिवशी ८ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. नंदूरबार आणि समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात आठ जणांची जीव गमावला. या घटनेनं महाराष्ट्र हादरला आहे. नंदूरबारमधील तळोदा तालुक्यात एक भीषण अपघाताचं वृत्त समोर आलं आहे. (Six people died in Nandurbar accident)
नंदुरबारमधील तळोदा तालुक्यातील चांदशैली घाटात पिकअप टॅम्पो उलटून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सहा जणांच्या मृत्यूची प्राथमिक माहिती हाती लागली आहे. या पिकअप टॅम्पोमध्ये 15 हून अधिक प्रवासी प्रवास करीत असल्याची माहिती आहे. जखमींची संख्या अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जखमींमधील तीन ते चार जणांची प्रकृती गंभीर आहे.
नक्की वाचा - Dog bite: कुत्रा चावला पण दुर्लक्ष केलं, 2 महिन्यांनी तरुणाची भीषण अवस्था; तडफडत रुग्णालयातच मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, सर्वजण पिकअप टॅम्पोमधून अस्तंबा यात्रेसाठी गेले होते. यामध्ये मोठ्या संख्येने तरुणांचा समावेश होता.
समृद्धीवरही भीषण अपघात..
वाशिम जिल्ह्यातील मालेगांव ते जउळका रेल्वे दरम्यानच्या समृद्धी महामार्गावरील डव्हा पेट्रोल पंपाजवळ रात्री अडीच वाजेदरम्यान भीषण अपघात झाला आहे. मुंबईवरून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या कारवरील चालकाचं नियंत्रण सुटल्याने भरधाव असलेली कार थेट डिव्हायडरवर जाऊन आदळली. यात म्यानमार या देशातील 6 जणांच्या एकाच कुटुंबातील 40 वर्षीय वडील आणि 13 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला. 63 वर्षीय आजोबा गंभीर जखमी आहेत. या भीषण अपघातात आई, मावशी, मामा आणि चालक असे 4 जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.अपघातग्रस्त कारमधील कुटुंब मुंबईवरून जगनाथ पुरी येथे जात असल्याची माहिती आहे. या अपघातात कारचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world