- नंदुरबार जिल्ह्यातील कहाटुळ येथे 21 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिलेचा मृतदेह शेताच्या बांधावर आढळला
- महिलेच्या मृत्यूच्या बाबतीत घातपात झाल्याचा प्राथमिक संशय असून पोलीस सखोल तपास करत आहेत
- दोषींवर कारवाई करण्याची नातेवाईकांची मागणी
- प्रशांत जव्हेरी, प्रतिनिधी
Nandurbar News: नंदुरबार जिल्ह्यातीन एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. शहादा तालुक्यातील कहाटुळ येथील 21 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका महिलेचा मृतदेह तिच्याच गावातील शेताच्या बांधावर आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालंय. या महिलेचा घातपात झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
नंदुरबारमध्ये नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, कहाटुळ येथील ही महिला मागील 21 दिवसांपासून बेपत्ता होती. तिच्या कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेऊनही ती न सापडल्याने अखेर शहादा पोलीस ठाण्यात ती बेपत्ता (Missing) असल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. पोलीस आणि कुटुंबीय गेल्या तीन आठवड्यांपासून तिचा शोध घेत होते. पण तिच्याच शेताच्या बांधावर तिचा मृतदेह आढळून आल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला.
(नक्की वाचा: Ahilyanagar: थरारक! भरवस्तीत दुचाकीस्वाराचा अंदाधुंद गोळीबार; कुख्यात गुंड सागर मोहळकर रक्ताच्या थारोळ्यात)
घातपाताचा संशय आणि नागरिकांची मागणी
महिलेचा मृतदेह ज्या स्थितीत सापडला, त्यावरून तिचा घातपात झाला असावा, असा संशय तिच्या नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळताच समाजातील बांधव आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींना तत्काळ अटक करावी आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.
(नक्की वाचा: Pune News: सुटकेसाठी पत्नीने पतीला दिले 50,000 रुपये; पुण्यातील 'त्या' घटस्फोटाची मोठी चर्चा)
पोलीस तपास सुरूघटनेची माहिती मिळताच शहादा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला असून, मृतदेह पोस्टमार्टेमसाठी (Post-Mortem) शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. 21 दिवस ही महिला कुठे होती आणि तिचा मृत्यू नेमका कधी आणि कसा झाला, या प्रश्नांचे गूढ अद्याप कायम आहे.
पुढील तपास शहादा पोलीस करत आहेत.