प्रशांत जव्हेरी, नंदुरबार
Nandurbar News: एकीकडे राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु असतानाच नंदुरबारमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्यांविरोधात नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली असून तब्बल 40 लाख 38 हजार 560 रुपयांचा मुद्देमाल वाहनांसह जप्त करण्यात आला आहे.
नंदुरबारमध्ये मोठी कारवाई...
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नंदुरबार जिल्ह्यात अवैध दारू वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केल्याचे समोर आले आहे. या कारवाईत 2 चारचाकी वाहने आणि 232 पेट्या विदेशी दारू हस्तगत करण्यात आली असून दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही मोठी कारवाई करण्यात आली.
Latur News : एक चूक आणि... रात्रभर पोलिसांच्या वाहनात काय घडायचं? लातूरच्या तरुणानं VIDEO करत संपवलं आयुष्य
पोलिसांनी अंकलेश्वर–बऱ्हाणपूर महामार्गावरील मोरांबा फाटा येथे रात्रीच्या सुमारास सापळा रचून पांढऱ्या रंगाची वॅगनर कार आणि विनानंबर प्लेटचे टाटा 407 वाहन ताब्यात घेतले. या वाहनांच्या तपास घेतले असता विदेशी दारूच्या 232 पेट्या, एकूण 23 लाख 38 हजार 560 रुपयांची दारू, आणि दोन चारचाकी वाहने असा एकूण 40 लाख 38 हजार 560 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65, 108 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
नक्की वाचा : Nagpur News : मित्राचं लग्न ठरलं, पार्टी झाली पण 'तो' परतलाच नाही; 11 मित्रांचा बेजबाबदारपणा CCTV मध्ये कैद )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world