Nashik News: नाशिक हादरले! पीजीत राहणाऱ्या तरुणीची भररस्त्यात हत्या, आरोपी तरुणाचेही टोकाचे पाऊल

Nashik News: नाशिकमध्ये तरुणीची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. या घटनेनंतर काही तासांतच संशयित आरोपी तरुणानेही आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाचा सविस्तर वृत्त.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Nashik News: नाशिकमध्ये भररस्त्यात तरुणीची हत्या"
NDTV Marathi

- प्रांजल कुलकर्णी 
Nashik News:
नाशिकमधील इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अतिशय धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शुक्रवारी (17 जुलै) रात्री एका तरुणीची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्यानंतर, शनिवारी (18 जुलै) पहाटेच्या सुमारास संशयित आरोपी तरुणाचाही मृतदेह पोलिसांना आढळून आला आहे. तरुणीची हत्या केल्यानंतर आरोपीने स्वतः आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.

सोसायटीच्या गार्डनमध्ये झाली हत्या

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या इंदिरानगर भागातील वनसंपदा सोसायटीत ही घटना घडली. मृत तरुणीचे नाव वैष्णवी अनिल आवारे असे असून ती या परिसरात एका पीजी (Paying Guest) मध्ये राहत होती. शुक्रवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास वनसंपदा सोसायटीच्या गार्डनमध्ये वैष्णवीची हत्या करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला.

Advertisement

(नक्की वाचा: Latur News : सामाजिक कार्यकर्त्या राधिका पाटील यांचा विष पिऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न, पोलिसांवर गंभीर आरोप)

पहाटे पोलिसांना आढळला तरुणाचा मृतदेह

तरुणीच्या हत्येच्या घटनेचा तपास सुरू असतानाच, 18 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास पोलिसांना इंदिरानगर हद्दीतच एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. या तरुणाने आत्महत्या केल्याचे प्राथमिक वृत्त आहे. हा तरुण दुसरा कोणी नसून वैष्णवीची हत्या करणारा संशयित आरोपीच असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तरुणीची हत्या केल्यानंतर भीतीपोटी किंवा पश्चात्तापातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

(नक्की वाचा: Jalgaon Crime: महाराष्ट्र हादरला! नवऱ्याकडून ट्रॅक्टरचे भाडे थकले, 4 नराधमांनी बायकोची अब्रु लुटली)

प्रेमप्रकरणातून टोकाचे पाऊल?

या संपूर्ण प्रकरणामागे प्रेमप्रकरण कारणीभूत असल्याचा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे. प्रेमसंबंधातून झालेल्या वादातून आधी तरुणीचा जीव घेण्यात आला आणि त्यानंतर आरोपीने स्वतःचे आयुष्य संपवले, या दिशेने सध्या पोलीस तपास करत आहेत.

दरम्यान, एकाच रात्रीत घडलेल्या या हत्येच्या आणि आत्महत्येच्या सत्रामुळे इंदिरानगर परिसरात भीतीचे आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे. इंदिरानगर पोलीस ठाण्याचे पथक या घटनेचा अधिक तपास करत असून, दोन्ही मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आले आहेत. पोलिसांच्या सखोल तपासानंतरच या घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होऊ शकणार आहे.