Nashik News : नाशिकमध्ये बहुराष्ट्रीय कंपनीत तरुणींचा धर्मांतरासाठी छळ; नमाजची सक्ती आणि बीफ खाण्याचा दबाव

Nashik MNC Forced Conversion Case : मंदिरांचं शहर असलेल्या नाशिक शहरातून एक अत्यंत खळबळजनक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
 Nashik MNC Forced Conversion Case : नमाज पठण करण्यासाठी सक्ती करणे, धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकणे , हे प्रकार या कंपनीत सुरु होते. (प्रतिकात्मक फोटो)
नाशिक:

 Nashik MNC Forced Conversion Case : मंदिरांचं शहर असलेल्या नाशिक शहरातून एक अत्यंत खळबळजनक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. येथील एका प्रसिद्ध बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या तरुणींना नरकयातना भोगाव्या लागल्याचे उघड झाले आहे. आर्थिक विवंचनेत असलेल्या आणि नोकरीची गरज असलेल्या तरुण महिलांना लक्ष्य करून त्यांच्यावर केवळ लैंगिक अत्याचारच करण्यात आले नाहीत, तर त्यांच्या धार्मिक भावनांशीही क्रूर खेळ खेळला गेला आहे. या प्रकरणाची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात घेता प्रशासनाने आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

पीडित महिलांची हतबलता आणि शोषण

या प्रकरणात तक्रार देणाऱ्या महिला या साधारणपणे 18 ते 25 वर्षे वयोगटातील आहेत. यातील बहुतांश महिला या आर्थिकदृष्ट्या गरजू असून नोकरीसाठी या नामांकित कंपनीत रुजू झाल्या होत्या. संशय आहे की, 2022 पासून हा धक्कादायक प्रकार सुरू होता. 

Advertisement

कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षित वातावरण देण्याऐवजी तिथे त्यांचे मानसिक आणि शारीरिक शोषण केले जात होते. नमाज पठण करण्यासाठी सक्ती करणे, धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकणे आणि बीफ खाण्यास भाग पाडणे यांसारखे अघोरी प्रकार या कंपनीत सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

( नक्की वाचा : माहेरच्यांनी 22 वर्षे ऐकला नाही आवाज! फरार कल्पना खरातच्या भावाचा आणि वडिलांचा दुर्दैवी अंत; पाहा वास्तव )
 

नऊ गुन्हे दाखल आणि सहा आरोपींना अटक

या प्रकरणात आतापर्यंत नऊ गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. मुंबई नाका पोलीस ठाण्यात धार्मिक भावना दुखावणे, विनयभंग आणि अत्याचाराचे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. तर देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात बलात्काराचा एक गुन्हा दाखल आहे. 

या प्रकरणात एकूण सहा आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. आसिफ अन्सारी, शफी शेख, शाहरुख कुरेशी, रजा मेमन आणि तौसिफ अत्तार अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून, यातील एक महिला आरोपी सध्या फरार आहे. न्यायालयाने या आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

( नक्की वाचा : सक्तीच्या धर्मांतरावर सरकारचा चाबूक; संस्थांवर बंदी अन् कठोर शिक्षेची तरतूद, वाचा नव्या कायद्याची सर्व माहिती )
 

तपासासाठी एसआयटीची स्थापना

या प्रकरणाचे गांभीर्य आणि समाजमनावर होणारे परिणाम पाहून पोलीस प्रशासनाने विशेष तपास पथकाची म्हणजेच एसआयटीची (SIT) स्थापना केली आहे. सहायक पोलीस आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली हा तपास सुरू असून, या रॅकेटमध्ये अजून कोणाचे हात गुंतलेले आहेत का, याचा शोध घेतला जात आहे. 

Advertisement

केवळ महिलाच नाही, तर एका पुरुष कर्मचाऱ्यालाही जबरदस्तीने इस्लाम धर्म स्वीकारायला लावल्याचा प्रकार समोर आल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. पोलीस या सर्व बाबींचा तांत्रिक आणि प्रत्यक्ष पुराव्यांच्या आधारे तपास करत आहेत.

नाशिकमधील या घटनेनंतर शहरातील सर्व खाजगी संस्था आणि कंपन्यांना महिलांच्या सुरक्षेबाबत कडक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कामाच्या ठिकाणी महिलांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी अंतर्गत तक्रार निवारण समित्या सक्रिय करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

Advertisement

तसेच, कोणत्याही पीडित महिलेला तक्रार करायची असल्यास त्यांनी पोलीस आयुक्तांच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर किंवा 112 या कंट्रोल रूम क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अशा संवेदनशील प्रकरणात तक्रार करण्यासाठी अनेकदा महिला पुढे येत नाहीत. हीच बाब लक्षात घेऊन प्रशासनाने तक्रारदाराची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, असे स्पष्ट केले आहे. पोलीस आयुक्तांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घातले असून, पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस दल कटीबद्ध असल्याचे सांगितले आहे. नाशिकसारख्या शांत शहरात घडलेल्या या प्रकारामुळे उद्योजक क्षेत्रातही चिंतेचे वातावरण पसरले आहे.
 

Topics mentioned in this article