आज 1 जानेवारी नववर्षाच्या पहिल्या दिवशी दिंडोरी येथून एक भयंकर प्रकार समोर आला आहे. बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अंतर्गत वादातून निघृणपणे हत्या करण्यात आली. क्षुल्लक वाद कारण ठरलं आणि थेट सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. यानंतर नाशिकच्या दिंडोरीमध्ये दोघांमधील वादातून आरोपीने कुऱ्हाडीने व्यक्तीचं डोकं छाटलं. पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ननाशी औटपोष्ट दिंडोरी येथून ही घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर नाशिक जिल्हा हादरला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दिंडोरीच्या भरवस्तीत आज सकाळी 10.15 च्या सुमारास प्राथमिक आरोग्य केंद्राजवळील ननाशी गावातील गुलाब रामचंद्र वाघमारे, सुरेश बोके आणि विशाल बोके यांच्यामध्ये काही कारणास्तव गेल्या दोन वर्षांपासून वाद धुमसत होता. त्यातून हा हत्येचा प्रकार घडला.
नक्की वाचा - Lucknow Crime : बांगलादेशी...धर्मपरिवर्तन अन् मंदिरावरुन वाद; अर्शदने आई अन् 4 बहिणींची का केली हत्या?
या वादाच्या कारणावरुण वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली होती. मात्र आज नववर्षाच्या सकाळीच गुलाब वाघमारे, सुरेश बोके, विशाल बोके यांच्यांतील वाद उफाळून आला. त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले. ते इतक्यावर थांबले नाहीत तर सुरेश बोके, विशाल बोके यांनी थेट गुलाब वाघमारे यांच्या मानेवर कुऱ्हाडीचा घाव घातला आणि शिर धडावेगळं केलं. या घटनेनंतर परिसरात हलकल्लोळ निर्माण झाला. बोके बंधु चित्रपटाप्रमाणे वाघमारेंचे डोके आणि हत्यार घेऊन ननाशी पोलीस चौकीत दाखल झाले आणि घडलेल्या प्रकाराचा खुलासा केला. खुनाच्या घटनेने ननाशीत तणावाची स्थिती निर्माण झाली असून पोलिसांची कुमक दाखल झाली आहे.